शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

जगातली सर्वात सुंदर राणी, तिच्या रहस्यमयी जीवनावर आजही केला जातोय रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 2:33 PM

तुम्ही इतिहासातील अशा अनेक राजकुमारी आणि राण्यांबाबत काहीना काही वाचल असेल ज्या त्यांच्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध होत्या. आणि इतिहासाच्या पानांवर त्यांचं सौंदर्य अमर आहे.

तुम्ही इतिहासातील अशा अनेक राजकुमारी आणि राण्यांबाबत काहीना काही वाचल असेल ज्या त्यांच्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध होत्या. आणि इतिहासाच्या पानांवर त्यांचं सौंदर्य अमर आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका राजकुमारीबाबत सांगणार आहोत, जी जगभरात सर्वात सुंदर राजकुमारी म्हणूनच ओळखली जाते.

इजिप्तची राजकुमारी क्लियोपॅट्राला सुंदरतेची देवी म्हटलं जातं. क्लियोपॅट्रा केवळ तिच्या सुंदरतेसाठी ओळखली जात नाही तर तिचं जीवनही फार रहस्यमय होतं. इतकं की आजही संशोधक तिच्या जीवनावर संशोधन करत असतात. क्लियोपॅट्रा जेवढी सुंदर होती, तेवढीच ती चतुर आणि षडयंत्र करणारी सुद्धा होती.

वडिलांच्या मृत्यूनंतर केवळ १४ व्या वर्षी क्लियोपॅट्रा आणि तिचा भाऊ टोलेमी दियोनिससला संयुक्त रूपाने राज्य मिळालं. पण भावाला बहिणीचा हस्तक्षेप सहन होत नव्हता आणि त्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता. क्लियोपॅट्राच्या हातून सत्ता गेली होती. त्यामुळे तिला सिरियामध्ये रहावं लागलं होतं. पण तिने हार मानली नव्हती.

(काल्पनिक छायाचित्र)

रोमचा शासक ज्यूलिअस सीजरला तिने तिच्या मोहात अडकवून इजिप्तवर हल्ला केला आणि सीजरने टोलेमीला मारून क्लियोपॅट्राला इजिप्तच्या राजसिंहासनावर बसवलं.

(Image Credit : heritagedaily.com)

क्लियोपॅट्राच्या मृत्यूबाबतही एक रहस्य आहे. रोमन राज्याआधी सम्राट ऑगस्टसने क्लियोपॅट्राला हरवल्यावर आपलं शासन स्थापन केलं होतं. एका रिसर्चनुसार, जेव्हा ऑगस्टसकडे वर्षातील एका महिन्याला त्याचं नाव देण्याची संधी होती. तेव्हा त्याने क्लियोपॅट्राच्या पराभवाचं अनुस्मारक तयार करण्यासाठी आठवा महिना निवडला. ज्यात क्लियोपॅट्राचा मृत्यू झाला होता.

(काल्पनिक छायाचित्र)

ऑगस्टस क्लियोपॅट्राला रोममध्ये एक कैदी म्हणून ठेवणार होता. पण त्याला रोखण्यासाठी क्लियोपॅट्राने स्वत:ला संपवले होते. याने हे स्पष्ट होतं की, क्लियोपॅट्रा ही तिच्या प्रेमासाठी मरण पावली नव्हती. क्लियोपॅट्रा आज इतिहासातील एक अशी रहस्यमय व्यक्ती झाली आहे की, जिच्या रहस्यमय जीवनावरून पडदा उठवण्याचं काम अजूनही सुरू आहे.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सhistoryइतिहासJara hatkeजरा हटके