इथे बनवलं जात आहे लाकडापासून एक अख्खं शहर, ठरेल जगातील पहिली वुडन सिटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 12:50 PM2023-11-25T12:50:19+5:302023-11-25T12:51:23+5:30

Wooden City : स्वीडन या देशात जगातील पहिलं वुडन शहर वसवण्याची योजना घोषित केली आहे. हे जगातील सगळ्यात मोठं लाकडी शहर असेल.

Worlds largest wooden city set to be built in Stockholm | इथे बनवलं जात आहे लाकडापासून एक अख्खं शहर, ठरेल जगातील पहिली वुडन सिटी

इथे बनवलं जात आहे लाकडापासून एक अख्खं शहर, ठरेल जगातील पहिली वुडन सिटी

Wooden City : जगभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये तुम्ही अनेक उंचच उंच इमारती बघितल्या असतील. या इमारतींमध्ये अनेक आधुनिक सुविधाही असतात. यातील जास्तीत जास्त इमारती या सिमेंट, लोखंडापासून तयार केलेल्या असतात. पण आता एक वेगळा प्रयोग होणार आहे. आता एक पूर्ण शहरच लाकडापासून तयार केलं जाणार आहे. म्हणजे इथे इमारतीही लाकडांपासून बांधल्या जातील आणि येथील प्रत्येक वस्तू लाकडाची असेल. स्वीडन या देशात जगातील पहिलं वुडन शहर वसवण्याची योजना घोषित केली आहे. हे जगातील सगळ्यात मोठं लाकडी शहर असेल.

सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार, स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये जगतील पहिली वुडन सिटी तयार केली जाणार आहे. यामागे डेनिश स्टूडियो हेनिंग लार्सन आणि स्वीडिश फर्म व्हाईट आर्किटेक्टर यांचं डोकं असल्याचं सांगितलं जात आहे. 2025 पर्यंत या शहराचं काम सुरू होईल आणि 2027 पर्यंत काम पूर्ण होईल. अलिकडेच नॉर्वे आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये लाकडाच्या गगनचुंबी इमारती बनवण्यात आल्या. सिंगापूरमध्येही गेल्यावर्षी 468,000 स्क्वेअर फूटावर एक विशाल कॉलेज बांधण्यात आलं. हे कॉलेज पूर्णपणे लाकडापासून तयार करण्यात आलं आहे. लाकडापासून बनवलेलं आशियातील हे सगळ्यात मोठं कॉलेज आहे.

रिअर इस्टेट डेव्हलपर एट्रियम लजंगबर्ग यानी सांगितलं की, स्टॉकहोममध्ये बनत असलेलं हो अनोखं शहर 250,000 वर्ग किलोमीटर परिसरात असेल. यात 7 हजार ऑफिसेस, 2 हजार घरे असतील ज्यात लोकं राहू शकतील. त्याशिवाय रेस्टॉरंट, दुकाने आणि पार्कही बनवले जातील. एका शहरासारखं इथे सगळं असेल. बिल्डरनुसार, या जागेवर आधीच 400 पेक्षा जास्त कंपन्या काम करत आहेत. तुम्हाला पाच मिनिटांचं शहरही म्हणू शकता. म्हणजे 5 मिनिटात तुम्ही हे शहर फिरू शकता. 

लाकूड सिमेंटचा बेस्ट पर्याय

एट्रियम लजंगबर्गचे सीईओ एनिका अनास म्हणाले की, आम्ही लाकडाला सिमेंट आणि स्टीलच्या बदल्यात टिकाऊ म्हणून निवडलं आहे. हे शहर स्वीडनच्या इनोव्हेशनच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल. अनेक एक्‍सपर्टने लाकडाच्या इमारतींना आग लागण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. पण इंजिनिअर म्हणाले की, त्यासाठी खास व्यवस्था केली जाईल. रिसर्चमध्ये आढळलं की, लाकडाच्या इमारतींमध्ये हवेची गुणवत्ता चांगली असते. यांना बनवण्यासाठी कार्बनचं उत्‍सर्जनही कमी होईल.

Web Title: Worlds largest wooden city set to be built in Stockholm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.