जगातील सगळ्यात खतरनाक जमाती, जिथे आई-वडिलांचे मृतदेह खात होते लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 15:46 IST2026-02-27T15:44:50+5:302026-02-27T15:46:05+5:30

Unique Tribe: आज आम्ही आपल्याला अशाच एका रहस्यमय जमातीबाबत सांगणार आहोत, जे आपल्याच आई-बापाचे मृतदेह खात होते.

World most terrifying tribes where people eat their parents bodies | जगातील सगळ्यात खतरनाक जमाती, जिथे आई-वडिलांचे मृतदेह खात होते लोक

जगातील सगळ्यात खतरनाक जमाती, जिथे आई-वडिलांचे मृतदेह खात होते लोक

Unique Tribe: जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हजारो आदिवासी जमाती राहतात. यातील काही जमाती फारच रहस्यमय असतात. या जमातींचं राहणीमान, परंपरा आणि खाण्या-पिण्याची संस्कृती देखील वेगळी असते. ज्याबाबत वाचून आपल्याला धक्का बसतो. आज आम्ही आपल्याला अशाच एका रहस्यमय जमातीबाबत सांगणार आहोत, जे आपल्याच आई-बापाचे मृतदेह खात होते. 

डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, या आदिवासी जमातीचं नाव 'फोर' होतं. ही जमातीतील लोक आपल्या अनोख्या अंत्यसंस्कारासाठी ओळखले जात होते. या लोकांमध्ये कुटुंबातील मृत व्यक्तीला दफन करण्याऐवजी किंवा जाळण्याऐवजी खाण्याची परंपरा होती. 

फोर जमाती पापुआ न्यू गिनी ओकापा जिल्ह्यात राहत होते. खासकरून १९६० च्या दशकात या परंपरेचं पालन केलं जात होतं. इथे मृत्यूनंतर मृतदेह जमिनीत पुरण्याची परंपरा जवळपास नव्हतीच.

या जमातीतील लोकांचं मत होतं की, मृतदेह कीटकांनी खाण्यापेक्षा चांगलं आहे की, कुटुंबियांनीच खावा. त्याच्यानुसार हे काही विचित्र किंवा अघोरी काम नाही. उलट मृत व्यक्तीला सन्मान देण्याची पद्धत आहे. 

रिपोर्टनुसार, फोर जमाती जवळपास पूर्ण शरीर खात होते. कडवट टेस्टमुळे पित्ताची पिशवी म्हणजे गॉलब्लॅडर खात नव्हते. महिलांचा मृतदेह खाण्यासाठी वेगळे नियम होते.

१९६० - ७० च्या दशकात ही परंपरा वेगाने कमी नष्ट झाली. संशोधकांनी सांगितलं की, असं करणं अनेक घातक आजाराचं कारण ठरू शकतं. त्यानंतर हळूहळू फोर जमातीने ही प्रथा सोडून दिली आणि आधुनिक पद्धती स्वीकारल्या.

Web Title : फोर जनजाति: दुनिया की सबसे खतरनाक जनजाति जो अपने मृत माता-पिता को खाती थी।

Web Summary : पापुआ न्यू गिनी की फोर जनजाति सम्मान के प्रतीक के रूप में मृतकों का भक्षण करती थी। 1960 के दशक तक आम यह प्रथा स्वास्थ्य संबंधी चिंताओं और आधुनिक प्रभावों के कारण समाप्त हो गई।

Web Title : Foré Tribe: World's most dangerous tribe ate their dead parents.

Web Summary : The Foré tribe of Papua New Guinea practiced ritualistic cannibalism, consuming deceased relatives as a sign of respect. This practice, common until the 1960s, ended due to health concerns and modern influences.