(Image Credit : www.dailymail.co.uk)
अलिकडे आपण नेहमीच पत्नीने पतीची निर्घुण हत्या केल्याच्या किंवा पतीने पत्नीची हत्या केल्याच्या घटना सतत वाचत-ऐकत असतो. पण सध्या सोशल मीडियात जी घटना चर्चेचा विषय ठरली, ती वाचून तुमच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही किस करण्यापूर्वी दोनदा विचार नक्कीच कराल.
स्पेनच्या एका तरूणीने तिच्या एक्सला शेवटचा किस करण्याच्या बहाण्याने त्याच्या जिभेला जोरदार चावा घेतला. या घटनेनंतर महिलेला अटक करण्यात आली असून तिला याप्रकरणी ८ वर्षांची तुरुंगावासाची शिक्षा होऊ शकते. ही घटना स्पेनच्या बार्सिलोनामध्ये घडली आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, आडिया लोपेज इस्टीवनेने तिच्या बॉयफ्रेन्डसोबत दुसऱ्यांदा ब्रेकअप केलं आणि शेवटचा किस घेण्याच्या बहाण्याने त्याच्या जिभेला चावा घेतला. या दोघांचं पहिलं रिलेशनशिप केवळ दोन महिनेच टिकलं होतं. जे २०१६ मध्ये सुरू झालं होतं.
त्यानंतर पुन्हा एकदा दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. पण चार महिन्यात आडियाच्या एक्सने तिला सांगितले की, तिच्या सततच्या मूड बदलण्याने तो हैराण झाला आहे. जेव्हा तिने हे ऐकलं तेव्हा ती चांगलीच संतापली आणि तिला राग अनावर झाला. जोरजोरात ओरडू लागली होती.
यादरम्यान अपार्टमेंटमध्ये चांगला गोंधळ झाला. पण काही वेळातच ती बॉयफ्रेन्डकडे परत आली आणि त्याला लागोपाठ किस करु लागली. यादरम्यान तिने बॉयफ्रेन्डच्या जिभेला जोरदार चावा घेत तुकडा पाडला. जिभेचा तोडलेला तुकडा तिने जमिनीवर थुंकून पळाली.
इकडे तिचा बॉयफ्रेन्ड वेदनेमुळे विव्हळत होता. त्यांच्या तोंडातून खूप जास्त रक्त वाहत होतं. शेजाऱ्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. लगेच पोलिसांनी तिला अटक केली. पण ती काही सांगायला तयार नव्हती. आता या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून तिला कोर्टात सादर केलं जाणार आहे. तिला ८ वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.
आरोपी महिलेने बॉयफ्रेन्डची जिभ कापली नसल्याचं म्हटलं आहे. तिने तिच्या एक्सवर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला आहे. तिने हा सुद्धा आरोप लावला आहे की, जेव्हा ती घर सोडून जात होती तेव्हा बॉयफ्रेन्डने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता.