"तो मला घाबरवतोय!"; आधी महिलेने भूताशी हौसेने लग्न केलं, आता हवाय घटस्फोट; म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 11:27 IST2023-04-11T11:22:18+5:302023-04-11T11:27:47+5:30
महिलेने भूताशी लग्न केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. आता तिला त्याच्यापासून घटस्फोट हवा आहे.

"तो मला घाबरवतोय!"; आधी महिलेने भूताशी हौसेने लग्न केलं, आता हवाय घटस्फोट; म्हणते...
ब्रिटनमधील महिलेने भूताशी लग्न केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. आता तिला त्याच्यापासून घटस्फोट हवा आहे. रॉकर ब्रोकार्डे य़ा महिलेने चर्चमध्ये हॅलोविन 2022 रोजी एडवर्डो नावाच्या भूताशी लग्न केलं होतं. ही एक गायिका असून तिने दावा केला आहे की, भूताला भेटल्यानंतर पाच महिन्यांनीच तिने लग्न केले. दुर्दैवाने, लग्नानंतर समुपदेशन करूनही त्याचा उपयोग झाला नाही.
महिलेने सांगितले की तिच्या भूत पतीने तिचे जीवन नरक बनवले आहे आणि तिने पुढे जाण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरही तो तिचा सतत पाठलाग करत आहे. ब्रोकार्डेच्या म्हणण्यानुसार, तो अजूनही तिचा पाठलाग करतो. भूताला तिच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी ती भूत काढण्याचा विचार करत असल्याचा दावाही महिलेने केला आहे. ती महिला म्हणाली, मला हार मानायची नाही.
भूताशी लग्न केल्यानंतर त्यातून सुटका होणे कठीण झाले आहे, असे वाटते. लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीबद्दल बोलताना ती म्हणाली, "या समारंभात जिवंत आणि मृत लोकांना आमंत्रण देण्यात आले होते, मर्लिन मुनरो, एल्विस आणि हेन्री आठवा चॅपलमध्ये आले होते. सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.
महिलेने तिच्या हनीमूनची आठवण सांगितली. संपूर्ण ट्रिप दिवसेंदिवस खराब झाल्याचं तिने म्हटलं आहे. एडवर्डोने मला वाळूत खेळण्यासाठी खाली पाडण्याचा करण्याचा विचार केला. ते क्षण भावनिक आणि रोमँटिक होत होते, परंतु मी माझे आईस्क्रीम त्याच्यासोबत शेअर केले आणि वाळू माझ्या चेहऱ्यावर आणि केसांवर अडकली होती, त्यामुळे मला एका विशाल सीगलशी लढल्यासारखे वाटलं असं महिलेने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"