नातवंड खेळवण्याच्या वयात आजीबाई शोधताहेत प्रेम; 2 लाख घ्या अन् बॉयफ्रेंड शोधा, दिली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 15:25 IST2022-12-07T15:23:32+5:302022-12-07T15:25:25+5:30

23 वर्षांचे लग्न तुटल्यानंतर महिलेला खूप एकटेपणा जाणवू लागला होता, अशा परिस्थितीत तिने स्वतःसाठी प्रेम शोधण्यास सुरुवात केली.

woman wants to find love at 60 paid 2 lakh rupees to social media influencer for matching with boyfriend | नातवंड खेळवण्याच्या वयात आजीबाई शोधताहेत प्रेम; 2 लाख घ्या अन् बॉयफ्रेंड शोधा, दिली ऑफर

फोटो क्रेडिट - Isabella Arpino

प्रेमाला वयाचं बंधन नसतं. वयाच्या 60-70 व्या वर्षीही लोक प्रेमाच्या शोधात असतात. त्यांना काहीही झालं तरी बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड हवीच असते. अशीच एक हटके घटना आता समोर आली आहे. नातवंडांना खेळवण्याच्या वयात एक आजीबाई चक्क प्रेम शोधत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी 2 लाख घ्या अन् बॉयफ्रेंड शोधा अशी ऑफर दिली आहे. वयाच्या 60 व्या वर्षी  त्या बॉयफ्रेंडच्या शोधात आहेत.

एक ब्रिटिश महिला स्वतःसाठी मस्त बॉयफ्रेंड शोधत आहे. इसाबेला एर्पिनो या लंडनमधील ईस्टकोट येथील रहिवासी आहेत. 23 वर्षांचे लग्न तुटल्यानंतर महिलेला खूप एकटेपणा जाणवू लागला होता, अशा परिस्थितीत तिने स्वतःसाठी प्रेम शोधण्यास सुरुवात केली. यासाठी तिने सोशल मीडिया एनफ्लुएन्सरला दोन लाख रुपये फी देखील दिली आहे.

मिररच्या रिपोर्टनुसार, इसाबेला अर्पिनो 3 मुलांची आई आहे आणि ती 23 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. जेव्हा त्यांचे नाते तुटले तेव्हा तिला खूप एकटेपणा जाणवत होता. चार वर्षांनंतर तिने डेटिंग एपवर जोडीदार शोधण्यास सुरुवात केली. पण तिला कुठूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे तिने टिकटॉकवर रिलेशनशिप कोच जेकला पाहिले आणि तिने त्याला शेवटची संधी दिली. जेकसाठीही हे एक मोठे काम होते कारण तो दोन नातवंडांच्या आजीसाठी प्रियकर शोधायचा होता.

इसाबेलाने या कामासाठी जेकला दोन लाख रुपयांहून अधिक हप्ते दिले. ती स्वतः मानते की मुले आणि नातवंडे झाल्यानंतर प्रेम मिळवणे सोपे काम नाही. शेवटी जेकला तिच्यासाठी एक जोडीदार सापडला आणि ती इयानला भेटली. सुरुवातीला सगळे तिच्यावर हसत होते. मात्र, त्यांच्या आता चांगलं नात असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच कुटुंबीय देखील खूश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: woman wants to find love at 60 paid 2 lakh rupees to social media influencer for matching with boyfriend