'एक कप चहा दे...', पतीने डिमांड करताच पत्नीने चाकूने केला हल्ला; छातीमधून रक्ताची धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 10:33 IST2023-01-23T10:33:24+5:302023-01-23T10:33:51+5:30

UP News : ही घटना फर्रुखाबादमधील बुढ़नामऊ गावातील आहे. पीडित व्यक्तीचं नाव नितीन आहे. त्याच्या लग्नाला 15 वर्षे झाली आहेत आणि त्यांना तीन मुलेही आहेत.

Woman stabs husband with knife due to tea in UP Farrukhabad | 'एक कप चहा दे...', पतीने डिमांड करताच पत्नीने चाकूने केला हल्ला; छातीमधून रक्ताची धार

'एक कप चहा दे...', पतीने डिमांड करताच पत्नीने चाकूने केला हल्ला; छातीमधून रक्ताची धार

UP News : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमधून पती-पत्नीच्या भांडणाची एक अशी घटना समोर आली जी वाचून कुणीही हैराण होईल. ही बातमी वाचून चहा शौकीन लोक थोडे घाबरूही शकतात. इथे एका पत्नीने आपल्या पतीवर केवळ यामुळे चाकूने हल्ला केला कारण त्याला चहाची तलब आली होती आणि त्याने त्याच्या पत्नीकडे चहाची डिमांड केली.

ही घटना फर्रुखाबादमधील बुढ़नामऊ गावातील आहे. पीडित व्यक्तीचं नाव नितीन आहे. त्याच्या लग्नाला 15 वर्षे झाली आहेत आणि त्यांना तीन मुलेही आहेत. ज्या घरात ही घटना घडली त्या घरात आधीच जरा कौटुंबिक समस्या सुरू होती. कारण होतं दूध सांडण्याचं. ज्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता.

या वादानंतर जेव्हा घरात वातावरण थोडं शांत झालं तेव्हा पतीला चहाची तलब आली. तो त्याच्या पत्नीला म्हणाला की, मला एक कप चहा दे. ज्यावर पत्नी भडकली आणि ती पतीसोबत भांडू लागली होती. त्यानंतर तिने पतीवर चाकूने हल्ला केला. कुणाला काही समजायच्या आत रागाच्या भरात तिने चाकूने पतीच्या छातीवर वार केला. ज्यामुळे त्याच्या छातीतून भरपूर रक्त येऊ लागलं होतं.

या घटनेनंतर नितीनला लगेच लोहिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण नंतर त्याला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं. नितीन या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता आणि त्याची स्थिती अजूनही गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

Web Title: Woman stabs husband with knife due to tea in UP Farrukhabad