बापरे! आधीच्या नवऱ्याचं 'असं' सत्य समोर आलं की महिलेने मुलांसह शहरचं सोडलं; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 15:31 IST2021-11-04T15:24:31+5:302021-11-04T15:31:56+5:30
एका महिलेला तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीचा एक कारनामा समजला आणि तिने टोकाचा निर्णय घेतल्याची घटना समोर आली आहे.

बापरे! आधीच्या नवऱ्याचं 'असं' सत्य समोर आलं की महिलेने मुलांसह शहरचं सोडलं; नेमकं काय घडलं?
पती-पत्नीच्या नात्यामध्ये अनेक गोष्टी सतत घडत असतात. काही गोष्टी या एकमेकांपासून लपवल्या जातात. मात्र कधीना कधी ते समजतच आणि पोलखोल होते. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका महिलेला तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीचा एक कारनामा समजला आणि तिने टोकाचा निर्णय घेतल्याची घटना समोर आली आहे. आधीच्या नवऱ्याचं 'असं' सत्य समोर आलं की महिलेने मुलांसह शहरचं सोडलं आहे. एका अमेरिकेतील महिलेने टिकटॉकवर आपल्या आधीच्या नवऱ्याबाबत (Ex-Husband) धक्कादायक खुलासे केले आहेत.
आधीच्या नवऱ्याने आपल्याला कित्येक वर्षे धोका दिल्याचं म्हटलं आहे. हॅली असं या महिलेचं नाव असून तिने नवऱ्याचे वेगवेगळ्या महिलांशी संबंध आहेत. तसेच त्यांच्यापासून त्याला नऊ आणखी मुलं आहेत असं देखील म्हटलं आहे. हॅलीने दिलेल्या माहितीनुसार, ती आपल्या मुलांसह शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली आहे. कारण तिला भीती आहे की आपली मुलं ही सावत्र बहीण-भावांसोबतच डेट करतील. आधीच्या नवऱ्याच्या या अशा वागण्याला कंटाळूनच हे शहर सोडण्याचा निर्णय घेतल्याचं तिने म्हटलं आहे.
पूर्वाश्रमीच्या पतीचा कारनामा ऐकून पत्नीने घेतला मोठा निर्णय
'मिरर यूके'ने दिलेल्या वृत्तानुसार, टिकटॉक व्हिडीओमध्ये हॅलीने माझी चार मुलं ही पूर्वाश्रमीच्या पतीच्या मुलांसोबत शाळेत जातील. त्यामुळे क्रश होण्याची जोखीम मला स्वीकारायची नाही. माझी चार मुलं आणि त्याची आणखी असलेली नऊ मुलं ही एकमेकांना या छोट्या शहरात भेटण्याची शक्यता ही खूप जास्त आहे. तसेच त्याची एक मुलगी ही आपल्याच चांगल्या मैत्रिणीची मुलगी आहे. त्यामुळेच पतीची पोलखोल झाली. हॅलीचा हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला असून त्यावर भन्नाट कमेंट्स लोक देत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.