शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : महिलेने स्वत:च्याच घराला लावली आग, नंतर अंगणात खुर्चीवर बसून बघता राहिली तमाशा.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 10:56 IST

ही घटना अमेरिकेच्या मेरीलॅंड शहरातील आहे. इंडिपेंडेंट डॉट यूकेच्या रिपोर्टनुसार, महिलेने आपल्याच घराला आग लावली.

जगभरातून वेगवेगळ्या विचित्र घटना नेहमीच ऐकायला मिळतात. लोक असा काही कारनामा करतात की, त्यावर विश्वासही बसत नाही. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिचं घर आगीच्या हवाली केलं आणि बाहेर खुर्चीवर बसून ती घर जळताना बघत राहिली. ही घटना अमेरिकेतील आहे. 

ही घटना अमेरिकेच्या मेरीलॅंड शहरातील आहे. इंडिपेंडेंट डॉट यूकेच्या रिपोर्टनुसार, महिलेने आपल्याच घराला आग लावली. यानंतर ती घरासमोरील लॉनवर खुर्ची टाकून आरामात बसली आणि घर जळताना बघत राहिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिथे उपस्थित अनेकांनी या महिलेचं घर जळताना पाहिली आहे. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ काढला.

घटनेआधी घरात काहीतरी हालचाल होते, त्यानंतर घरातून मोठा आवाज येतो. हा भांडणासारखा आवाज होता. त्यानंतर घराला अचानक आग लागते. घर हळूहळू पेटू लागतं. पाहता पाहता पूर्ण घर आगीच्या हवाली होतं. महिला बाहेर खुर्चीवरून घर जळताना बघत असते.

रिपोर्टनुसार, या महिलेचं नाव गेल मेटवली आहे. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. असे सांगितले जात आहे की, गेल मेटवलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप आणि मारझोड केल्याचा आरोप आहे. मेरीलॅंड अग्नीशमन दलाकडून सध्या या घटनेची चौकशी केली जात आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, एक व्यक्ती घराच्या बेसमेंटमध्ये अडकली होती. त्याचा रडण्याचा  आवाज ऐकून जवळच्या काही लोकांनी त्याला खिडकीतून बाहेर काढलं. त्याचा जीव वाचवला. सध्या महिला पोलिसांच्या ताब्यात आहे. रिपोर्टनुसार, पोलीस या घटनेच्या कारणांचा शोध घेत आहेत. महिलेच्या नातेवाईकांशी बोललं जाईल, शेजाऱ्यांशी बोललं जाईल.   

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारीfireआग