शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

कशासाठी?...पोटासाठी; मुलांना दोन घास भरवण्यासाठी आईनं केलं मुंडन, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 12:52 PM

त्यांच्यावर तीन मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी आहे.

तामिळनाडूतील सलेम शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सलेममध्ये एका आईला आपल्या मुलांचे पोट भरण्यासाठी तिच्यावर स्वतःचे मुंडन करण्याची वेळ आली. प्रेमा असे या तीन मुलांच्या आईचे नाव असून तिला आपले केस विकून अवघे 150 रुपये मिळाले आहेत. प्रेमा यांचे पती सेल्वन यांनी डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्यामुळे सात महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. सेल्वन हे वीटभट्टी कामगार होते. सेल्वन यांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कर्ज घेतले होते. त्यांच्यावर 2 लाख रुपयांचे कर्ज होते. 

प्रेमा या सध्या वीटभट्टीत काम करतात. त्यांच्यावर तीन मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी आहे. यासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते, संपले होते. त्यामुळे प्रेमा यांनी शेजारी आणि नातेवाईकांकडे मदत मागितली. मात्र, त्यांना कोणतीही मदत केली नाही. यावेळी एका व्यक्तीने प्रेमा यांना सांगितले की, तुमचे केस कापून द्या, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळतील. ही व्यक्ती प्रेमा यांच्या केसापासून टोपी तयार करणार होती. त्यानंतर प्रेमा यांनी आपले केस कापून त्या व्यक्तीला 150 रुपयांना विकले. या पैशातून प्रेमा यांनी आपल्या तीन मुलांना जेवण दिले.

दरम्यान, कर्जाच्या बोज्यामुळे प्रेमा या आपल्या पतिप्रमाणे आत्महत्या करण्याचा विचार करत होत्या. मात्र, त्यावेळी त्यांना जगण्याची नवी उमेद मिळाली.  ज्यावेळी ही घटना ग्राफिक डिझायनर असलेले जी. बाला यांना समजली. त्यावेळी त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी प्रेमा आणि तिच्या मुलांची मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहे. क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून मदत मिळत आहेत. आतापर्यंत प्रेमा आणि तिच्या मुलांसाठी एक लाख 45 हजार रुपयांची मदत मिळाली आहे. याशिवाय, जिल्हा प्रशासनाने प्रेमा यांना विधवा पेन्शन देण्यास मंजुरी दिली आहे. 

(५०० गोरगरीब मुलांना मोफत शिक्षण मिळवून देतेय 'ही' महिला)(वारकऱ्याला लागली पन्नास लाखांची लॉटरी; 'तो' भाग्यवान विजेता कोण?)(अजब तुझे सरकार; आईने मुलांना आगीतून वाचवलं, पोलिसांनी तिलाच तुरुंगात टाकलं!) 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेTamilnaduतामिळनाडू