शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

एका सेल्फीमुळे सापडली १७ वर्षांआधी हॉस्पिटलमधून पळवून नेलेली लहान बहीण!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 12:33 PM

आजच्या युगात तरूणांसाठी सेल्फीची क्रेझ बघायला मिळते, तर काही लोक याकडे श्राप म्हणून बघतात. कारण या सेल्फीच्या नादात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आजच्या युगात तरूणांसाठी सेल्फीची क्रेझ बघायला मिळते, तर काही लोक याकडे श्राप म्हणून बघतात. कारण या सेल्फीच्या नादात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सेल्फीला विरोध होत होता. पण याच सेल्फीमुळे दक्षिण आफ्रिकेतील लहानपणी हरवलेली दोन बहिणी पुन्हा भेटू शकल्या.  

दक्षिण आफ्रिकेच्या केपटाउन शहरात राहणाऱ्या दोन बहिणी १७ वर्षांआधी हॉस्पिटमधून वेगळ्या झाल्या होत्या. हॉस्पिटलमधील Lavona Solomon या महिलेने जन्माच्या तीन दिवसानंतर मुलीला पळवले होते. पण एका सेल्फीमुळे या दोन बहिणी आश्चर्यकारकरित्या एकत्र आल्या आहेत.

केपटाउनमध्ये राहणाऱ्या सेलेस्टेला दुसरी मुलगी मिशे झाली, तेव्हा तिची पहिली मुलगी कॅसिडी ही तीन वर्षांची होती. जन्माच्या तीन दिवसांनंतर हॉस्पिटलमधून एका महिलेने सेलेस्टेलाची मुलगी पळवली होती. ज्यामुळे मिशे ही तिची मोठी बहीण कॅसिडीपासून वेगळी झाली.

२० वर्षीय कॅसिडी ज्वानस्काव हायस्कूलमध्ये अंतिम वर्षाला होती. तेव्हाच तिथे मिशेने प्रवेश घेतला. दोघींचा स्कूलमध्ये अनेकदा आमनासामना होत होता. त्यांच्या मैत्रिणी म्हणत होत्या की, तीन वर्षांचं अंतर असूनही तुम्ही दोघी एकसारख्या दिसतात. तसेच दोघी जेव्हाही भेटायच्या तेव्हा त्यांनाही असं जाणवायचं की, त्यांच्यात काहीतरी नातं आहे.

एक दिवस कॅसिडीने मिशेसोबत सेल्फी काढला आणि आपल्या मित्रांना दाखवला. त्यानंतर हा सेल्फी कॅसिडीने तिच्या आई-वडिलांना दाखवला. हा सेल्फी पाहून कॅसिडीचे आई-वडील आश्चर्यचकित झाले. त्यांनी शंका व्यक्त केली की, मिशे त्यांची बालपणी पळवून नेलेली मुलगी आहे. तेव्हा कॅसिडीला कळालं की, बालपणी तिच्या एका बहिणीला पळवण्यात आलं होतं.

कॅसिडीने मिशेला विचारलं की, तुझी जन्मतारीख ३० एप्रिल १९९७ आहे का? यावर मिशेने 'हो' असं उत्तर दिलं. ज्यानंतर या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. मिशेची डीएनए टेस्ट करण्यात आली. तिचा डीएनए कॅसिडीच्या परिवाराशी मॅच झाला. त्यानंतर पोलिसांनी Lavona अटक केली. मिशेला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की, तिच्या आईने तिला बालपणी पळवून आणलं होतं. मिशेच्या आईने तिचं पालन-पोषण फारच लाडाने केलं होतं. त्यामुळे मिशेला फारच धक्का बसला.

कोर्टात हेच सांगण्यात आलं की, लोनोवाने मिशेला पळवलं कारण तिचा गर्भपात झाला होता. तिला बाळ हवं होतं. कोर्टाने आता या महिलेला दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दुसरकीडे मिशे हे ठरवू शकत नव्हती की, तिने तिच्या जन्मदात्या आईकडे जावं की, आधीच्याच घरी रहावं.  Lavona ला आणखी तीन मुलं आहेत, जे आता शासनाच्या कस्टडीत आहेत. अखेर मिशे तिच्या खऱ्या आईकडे गेली. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय