बॉयफ्रेंडने अनेक महिने शरीरासंबंधी हे सीक्रेट ठेवलं लपवून, समजलं तेव्हा बसला तिला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 12:56 IST2023-01-24T12:55:36+5:302023-01-24T12:56:18+5:30

सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, 'मी एका मुलाला तीन महिने डेट केलं. ज्यानंतर मला समजलं की, त्याला एक पायच नाहीये'.

Woman realize after 3 months that her boyfriend have just one leg | बॉयफ्रेंडने अनेक महिने शरीरासंबंधी हे सीक्रेट ठेवलं लपवून, समजलं तेव्हा बसला तिला धक्का

बॉयफ्रेंडने अनेक महिने शरीरासंबंधी हे सीक्रेट ठेवलं लपवून, समजलं तेव्हा बसला तिला धक्का

एका तरूणीने खुलासा केला आहे की, ती 17 वर्षांची असताना एका तरूणाच्या प्रेमात पडली. ती प्रेमात इतकी हरवली होती की, त्या मुलाला केवळ एकच पाय होता. तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, 'मी एका मुलाला तीन महिने डेट केलं. ज्यानंतर मला समजलं की, त्याला एक पायच नाहीये'.

तरूणीच्या या व्हिडीओला 2.1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तिने सांगितलं की, 'मी 17 वर्षांची होते. मी त्याला रस्त्यात पाहिलं होतं आणि विचार केला की, हा उंच आणि हॅंडसम तरूण आहे. मला तो हवा आहे'. आम्ही एकमेकांना मोबाइल नंबर दिले. तीन आठवड्यानंतर आम्ही प्रेमात पडलो'. महिलेने सांगितलं की, ती आणि तिचा 6 फूट उंच बॉयफ्रेंड एकमेकांना रोज भेटत होते. त्यांना वेगळंही व्हायचं नव्हतं. ते बराच वेळ सोबत घालवत होते.

तरूणीने पुढे सांगितलं की, तिला काही संकेत दिसले होते. जसे की, तो उन्हाळ्यातही फुल पॅंट घालत होता. चालताना जरा लंगडत होता आणि त्याला बास्केटबॉल गेममध्ये खेळण्यास मनाई केली गेली होती. मग जेव्हा तिने त्याचा एक फोटो पाहिला तेव्हा काहीतरी मिसिंग होतं.

तरूणी म्हणाली की, 'मी जेवढ्या बारकाईने बघत होते, तेवढं मला वाटत होतं की, माझ्यासोबत दगा केला जात आहे. मग मी तो फोटो माझ्या मित्रांना दाखवला. त्यांना म्हणाले की, मला वाटतं की, कदाचित माझ्या बॉयफ्रेंडला एक पाय नाहीये'. बॉयफ्रेंडला याबाबत विचारल्यावर त्याने सगळं सत्य सांगितलं. त्याला पोलिओ झाला होता. आमचं रिलेशन केवळ सहा महिने चाललं. तरूणी म्हणाली की, कॉलेज सुरू झाल्यावर सगळं काही संपलं.

Web Title: Woman realize after 3 months that her boyfriend have just one leg