64 लाख रूपये खर्च करून पतीपासून घेतला घटस्फोट, 4 वर्षानंतर पुन्हा त्याच्याकडूनच झाली प्रेग्नंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 13:23 IST2023-02-21T13:05:43+5:302023-02-21T13:23:10+5:30
Woman Remarried Ex Husband After 4 Years : टिकटॉक यूजर एमीस (Ames) ने स्वत: सोशल मीडियावर तिच्या नात्याची अजब कहाणी सांगितली आहे. महिलेनुसार, तिने तिच्या पतीकडून मोठी रक्कम खर्च करत घटस्फोट घेतला होता.

64 लाख रूपये खर्च करून पतीपासून घेतला घटस्फोट, 4 वर्षानंतर पुन्हा त्याच्याकडूनच झाली प्रेग्नंट
Woman Remarried Ex Husband After 4 Years : आपल्या देशात लग्नाला सात जन्माचं नातं मानलं जातं. एकदा जर कुणाचं लग्न झालं तर ते टिकवण्यासाठी लोक काहीही करतात. पण इतर देशांमध्ये असं नाहीये. लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून घटस्फोट घेतात. नंतर त्यांना पश्चाताप होतो. अशीच एक घटना समोर आली आहे. एमीस नावाच्या महिलेने घटस्फोट घेतल्यावर 4 वर्षानी पुन्हा त्याच व्यक्तीसोबत लग्न केलं.
टिकटॉक यूजर एमीस (Ames) ने स्वत: सोशल मीडियावर तिच्या नात्याची अजब कहाणी सांगितली आहे. महिलेनुसार, तिने तिच्या पतीकडून मोठी रक्कम खर्च करत घटस्फोट घेतला होता. दोघेही वेगवेगळे राहत होते. पण त्यांच्या नात्याने अजब वळणं घेतलं. ते दोघेही पुन्हा एकदा प्रेमात पडले आणि त्यानंतर त्यांनी मिळून दोन बाळांना जन्म दिला.
द सन की रिपोर्टनुसार, एमीस (Ames) ने टिकटॉक पोस्टमध्ये सांगितलं की, त्यांना एकूण पाच मुलं आहेत. जे अजब परिस्थितीमध्ये जन्माला आले होते. आधी तिने ज्या व्यक्तीसोबत लग्न केलं, त्याच्यासोबत वाद होत होता. तोपर्यंत तिने दोन मुलांना जन्म दिला होता. नंतर त्यांचा वाद इतका वाढला की, घटस्फोट झाला. या घटस्फोटासाठी तिने 64 लाखांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली. दोघेही नेहमीसाठी वेगळे झाले. नातं तुटल्यानंतर एका दुसऱ्या नात्यातूनही एमीसने एका मुलाला जन्म दिला आणि तीन मुलांसोबत ती राहत होती.
टिकटॉक व्हिडीओमध्ये महिलेने सांगितलं की, तिने कधी विचारही केला नव्हता की, तिला तिच्या आधीच्या पतीची इतकी कमतरता जाणवेल. घटस्फोटाच्या चार वर्षानंतर दोघांनी एकमेकांना पुन्हा एक संधी दिली. त्यांनी दोन मुलांना जन्म दिला. आता एमीस तिची पाच मुलं आणि पतीसोबत आनंदाने राहत आहे. तिने सांगितलं की, तिच्या आयुष्यात आता मुलांना जास्त महत्व आहे.