घराच्या छतावर महिलेला दिसलं डायनासॉरचं अंड, भीतीपोटी महिलेनं केलं असं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 18:15 IST2021-08-12T18:11:54+5:302021-08-12T18:15:20+5:30

एका महिलेनं काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक विचित्र फोटो टाकला होता. हा फोटो पाहुन हे नेमकं काय आहे याबद्दल तर्कवितर्क लढवले जातं होते. ती वस्तू अशी गोष्ट निघाली ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.

woman posted a photo on Facebook of dinosaur egg goes viral, see the truth | घराच्या छतावर महिलेला दिसलं डायनासॉरचं अंड, भीतीपोटी महिलेनं केलं असं....

घराच्या छतावर महिलेला दिसलं डायनासॉरचं अंड, भीतीपोटी महिलेनं केलं असं....

कुणाला कधी काय भास होईल याचा भरवसा नाही. एका महिलेनं काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक विचित्र फोटो टाकला होता. हा फोटो पाहुन हे नेमकं काय आहे याबद्दल तर्कवितर्क लढवले जातं होते. ती वस्तू अशी गोष्ट निघाली ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.

डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार या महिलेनं Family Lowdown Tips & Ideas या फेसबुक पेजवर हा फोटो शेअर केला होता. त्यावर तिनं लिहिलंय की माझ्या मित्राच्या मुलाच्या कपाटात ही गोष्ट गेली कित्येक दिवसांपासून होती. त्यांच्या कुटुंबाला कल्पनाही नव्हती की कधी पासून तिथे आहे? तुम्हाला काय वाटतं हे काय आहे आणि त्यांनी काय करावं?

लाललीच तिच्या या फोटोवर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेकांना हा फोटो बघुन धक्का बसलेला तर काहीजण हे नेमकं काय असेल याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत होते. एकाने म्हटलं हे कोळ्याचं घरटं असेल. त्यातील एका व्यक्तीनं तर कमेंट करून सर्वांना धक्काच दिला की, आपण जर अश्मयुगात असतो तर हे डायनॉसॉरचं अंड आहे असं मी म्हटलं असतं.

पण शेवटी लक्षात आलंच की हे नेमकं काय आहे. हा फोटो पोस्ट करणाऱ्या एमी नामक महिलेच्या सासऱ्याने ते जवळ जाऊन पाहिलं. त्याला भीती वाटतं होती की हे जमलेले किडे असतील पण तो होता साबणाचा फेस.

Web Title: woman posted a photo on Facebook of dinosaur egg goes viral, see the truth