महिलेनं ऑनलाईन ऑर्डर केला Apple iPhone, घरी आलं Apple फ्लेवर्ड ड्रिंक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 05:24 PM2021-03-02T17:24:30+5:302021-03-02T17:27:06+5:30

कुरिअरमधून आलेला बॉक्स उघडल्यावर महिलेच्या पायाखालची सरकली जमीन

Woman orders Apple iPhone 12 Pro Max gets an apple flavored yogurt drink instead | महिलेनं ऑनलाईन ऑर्डर केला Apple iPhone, घरी आलं Apple फ्लेवर्ड ड्रिंक

महिलेनं ऑनलाईन ऑर्डर केला Apple iPhone, घरी आलं Apple फ्लेवर्ड ड्रिंक

Next
ठळक मुद्देकुरिअरमधून आलेला बॉक्स उघडल्यावर महिलेच्या पायाखालची सरकली जमीनमहिलेनं ऑर्डर केला होता Apple iPhone 12 Pro Max

अनेकदा आपण ऑनलाईन वस्तू मागवत असतो.  ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्याचे प्रकारही आपल्या कानावर कधीतरी आले असतील. अशीच एक घटना एका महिलेसोबत घडली आहे. चीनमधील एका महिलेनं १ लाखांपेक्षाही अधिक महागडा Apple iPhone 12 Pro Max स्मार्टफोन कंपनीकडून मागवला होता. परंतु ज्यावेळी त्या महिलेला ते पार्सल मिळालं आणि ते उघडून पाहिलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. या बॉक्समध्ये Apple iPhone ऐवजी Apple फ्लेवर्ड ड्रिंक होतं. चीनची सोशल मीडिया वेबसाईट Weibo वर या महिलेनं या घटनेबद्दल सांगितलं आहे. 

लियू असं या महिलेचं नाव आहे. या महिलेनं Apple iPhone 12 Pro Max खरेदी करण्यासाठी १५०० डॉलर्स म्हणजेच जवळपास १.१० लाख रुपये भरले होते. दरम्यान, आपण हा मोबाईल Apple च्या ऑफिशिअल वेबसाईटवरून मागवल्याचा दावाही त्या महिलेनं केला. 


महिलेनं दिलेल्या माहितीनुसार फोनची डिलिव्हरी घरच्या पत्त्वायर असलेल्या एका लॉकरमध्ये होणं आवश्यक होतं. परंतु महिलेनं जेव्हा तो बॉक्स उघडला तेव्हा त्यात Apple फ्लेवर्ड ड्रिंक होतं. दरम्यान, Apple आणि त्यांची कुरिअर पार्टनर Express Mail Service नं आम्ही योग्य ठिराणी सामान पाठवल्याचं म्हटलं आहे. या घटनेनंतर महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 
 

Web Title: Woman orders Apple iPhone 12 Pro Max gets an apple flavored yogurt drink instead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.