बॉयफ्रेन्डनं किस करताच तरूणीची बिघडली तब्येत, कारण वाचून तुम्हीही व्हाल अवाक्!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 14:47 IST2024-12-27T14:47:08+5:302024-12-27T14:47:45+5:30
फोबेनं सांगितलं की, १८ वयाची अशताना तिनं पहिल्यांदा आपल्या बॉयफ्रेन्डला किस केलं होतं. हा किस तिच्यासाठी जीवघेणा ठरला होता.

बॉयफ्रेन्डनं किस करताच तरूणीची बिघडली तब्येत, कारण वाचून तुम्हीही व्हाल अवाक्!
प्रेमात पडलेल्या दोन व्यक्ती आपलं प्रेम व्यक्ती करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची मदत घेतात. प्रेम व्यक्त करण्याचं एका फेमस माध्यम म्हणजे किस मानलं जातं. तारूण्यातील प्रेम असेल तर तो क्षण आणि हे माध्यम आणखीनच खास ठरतं. पण एका तरूणीसोबत या खास क्षणी असं काही झालं की, तिचा रोमान्सचा मूडच निघून गेला आणि तब्येत बिघडली.
२८ वर्षीय फोबे कॅम्पबेल हॅरिस लंडनची टॉप प्रोड्यूसर आहे. तिने तिच्या जीवनात घडलेली एक अजब घटना सांगितली. जी फारच अजब आणि धक्कादायक आहे. फोबेनं सांगितलं की, १८ वयाची अशताना तिनं पहिल्यांदा आपल्या बॉयफ्रेन्डला किस केलं होतं. हा किस तिच्यासाठी जीवघेणा ठरला होता. हा क्षण ती आयुष्यभर विसरू शकणार नाही. त्याचं त्यामुळे झालेली वेदना.
फोबेनं सोशल मीडियावर किस्सा शेअर केला. तिनं सांगितलं की, आधी किस तिच्यासाठी रोमांचक होता, पण काही मिनिटांमध्येच इतका घातक ठरला की, तो ती कधीच विसरू शकणार नाही. किस केल्याच्या काही मिनिटांनंतर तिच्या घशात जडपणा जाणवला आणि शरीरावर लाल चट्टे व सूज आली. वाढती गंभीर स्थिती पाहून तिला इमरजन्सी इंजेक्शन देण्यात आलं. पण काही फायदा झाला नाही. जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा समजलं की, तिला एनाफिलेक्सिस नावाची एक गंभीर एलर्जी झाली आहे. जी योग्य उपचार न मिळाल्यानं जीवघेणी ठरू शकते. फोबेसोबत असं झालं, कारण तिच्या बॉयफ्रेन्डनं काहीतरी खाल्लं होतं, ज्याने ती एलर्जिक होती.
काय आहे हा आजार?
एनाफिलेक्सिस नावाची स्थिती काही खास गोष्टी जसे की, डाळ, डेअरी मासे यांमुळे शरीरात तीव्र प्रतिक्रिया होतात. जर याची काळजी घेतली गेली नाही तर ही समस्या जीवघेणी ठरू शकते. स्वत: फोबेला याबाबत माहीत होतं. पण तिला हे नव्हतं माहीत की, किसच्या माध्यमातूनही एलर्जी होऊ शकते. पबमेडच्या एखा रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, एनाफिलेक्सिस एकप्रकारची श्वासासंबंधी एलर्जी आहे. ज्यामुळे घशात सूज, श्वास घेण्यास त्रास आणि ब्लडज प्रेशरची समस्या होऊ शकते. जर वेळीच योग्य उपचार केले गेले नाही तर पीडिताचा जीवही जाऊ शकतो.