सोशल मीडियावर दिसलं असं काही, उद्ध्वस्त झाला महिलेचा संसार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 12:10 IST2024-04-09T12:10:27+5:302024-04-09T12:10:45+5:30

एका महिलेने कमेंट लिहिली होती की, ती दुसऱ्या दिवशी आपल्या पतीला फुटबॉल गेम खेळण्यापासून रोखण्याची योजना बनवत आहे आणि यासाठी ती त्याच्या चहात औषध मिक्स करणार आहे. 

Woman life shattered after discovers dark truth about husband on social media | सोशल मीडियावर दिसलं असं काही, उद्ध्वस्त झाला महिलेचा संसार...

सोशल मीडियावर दिसलं असं काही, उद्ध्वस्त झाला महिलेचा संसार...

एका महिलेला सोशल मीडियाचा वापर करताना असं काही आढळलं की, तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या लग्नाला 10 वर्षे झाली होती. त्यांना दोन मुलेही झाली. महिला म्हणाली की, ती फेसबुक बघत होती. तेव्हाच तिच्यासमोर पतीचं एक सत्य समोर आलं. महिला फेसबुकवर मातांसंबंधी एका ग्रुपवर पोस्ट बघत होती. यात एका महिलेने कमेंट लिहिली होती की, ती दुसऱ्या दिवशी आपल्या पतीला फुटबॉल गेम खेळण्यापासून रोखण्याची योजना बनवत आहे आणि यासाठी ती त्याच्या चहात औषध मिक्स करणार आहे. 

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, ही महिला इतर महिलांच्या कमेंट्स बघत होती. तेव्हा तिची नजर एका महिलेच्या प्रोफाइलवर इमेजवर पडली. या फोटोत ही अनोळखी महिला ज्या पुरूषासोबत होती तो या महिलेचा पती होता. जे बघून महिलेला धक्का बसला. तिने तिच्या पतीचा दुसऱ्या महिलेसोबत फोटो पाहिला होता. तिने प्रोफाइल आणखी चेक केलं तर अनेक गोष्टी समोर आल्या. तिला समजलं की, तिच्या पतीने एका दुसऱ्या महिलेसोबतही लग्न केलं आहे. ज्यातून त्यांना एक मुलगा आहे.

या महिलेने रेडिटवर आपली कहाणी शेअर केली आहे. तिने पोस्टमध्ये लिहिलं की, 'त्यांनी साध्या पद्धतीने लग्न केलं होतं. माझ्या पतीने एका फेक नाव आणि सरनेमसोबत एक प्रोफाइल बनवलं होतं. मला वाटतं, त्या मुलाचंही सरनेम फेक आहे. कारण महिलेने मुलाच्या जन्म प्रमाणपत्राचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात मुलाचं पूर्ण लिहिलं आहे'.

महिलेने आपल्या पोस्टच्या माध्यमातून लोकांना सल्ला देण्याची अपील केली आहे. तिने पतीसोबत दिसलेल्या महिलेला फेसबुकच्या माध्यमातून मेसेज पाठवला. त्या महिलेने उत्तर दिलं की, तिला नव्हतं माहीत की, तो आधीपासून विवाहित आहे. ती म्हणाली की, त्यांचं दोन वर्षाआधीच लग्न झालं होतं आणि त्यांचा मुलगा 14 महिन्यांचा आहे. यानंतर पोस्ट लिहिणाऱ्या महिलेने पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.

ती म्हणाली की, जेव्हा तिने याबाबत पतीला विचारलं तर त्याने दुसऱ्या महिलेसोबत राहण्याचा निर्णय घेतला. तो घर सोडून निघून गेला. त्याने पैसे देण्यासही नकार दिला. सोबतच तो म्हणाला की, तो नोकरी सोडेल, जेणेकरून मुलांनाही पैसे द्यावे लागू नये. लोक या महिलेच्या पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट्स देत आहेत.
 

Web Title: Woman life shattered after discovers dark truth about husband on social media