रात्री पतीसोबत संबंध ठेवताच सकाळी 'प्रेग्नेंट' असल्यासारखं दिसत होतं पोट, सत्य समोर आलं तर बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 14:30 IST2021-12-22T14:26:19+5:302021-12-22T14:30:46+5:30

३२ वर्षीय कॅटी सिम्स जेव्हाही तिच्या पतीसोबत संबंध ठेवत होती, तिला पोटात दुखत होतं. इतकंच नाही तर दिसायला असं वाटत होतं जणू ती प्रेग्नेंट झाली आहे.

Woman left in pain everytime after physical relation was actually having cyst | रात्री पतीसोबत संबंध ठेवताच सकाळी 'प्रेग्नेंट' असल्यासारखं दिसत होतं पोट, सत्य समोर आलं तर बसला धक्का

रात्री पतीसोबत संबंध ठेवताच सकाळी 'प्रेग्नेंट' असल्यासारखं दिसत होतं पोट, सत्य समोर आलं तर बसला धक्का

गेल्या वर्षात कॅन्सरसारख्या आजाराने अनेक सेलिब्रिटीचं जीवन संपलं. कॅन्सर असा आजार जो सुरूवातीलाच समजला तर ठीक होतो. उशीर झाला तर त्याला बरं करणं कठीण होऊन बसतं. सोशल मीडियावर एका महिलेने तिची एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात तिने सांगितलं की, वेळीच तिला तिच्या आजाराबाबत समजलं. महिलेच्या पोटात सिस्ट होतं. जे पतीसोबत संबंध बनवल्यामुळे कळून आलं. 

इंग्लंडच्या डिवॉनमध्ये राहणारी ३२ वर्षीय कॅटी सिम्स जेव्हाही तिच्या पतीसोबत संबंध ठेवत होती, तिला पोटात दुखत होतं. इतकंच नाही तर दिसायला असं वाटत होतं जणू ती प्रेग्नेंट झाली आहे. तिचं पोट फुगलेलं दिसत होतं. मैत्रिणींची नजरही कॅटीच्या फुगलेल्या पोटाकडे गेली. पण कुणी काही बोलत नव्हतं. हळूहळू कॅटीला जाणीव झाली की, हे  दुखणं संबंध ठेवल्यामुळे होणारं नाही तर वेगळ्याचं कारणामुळे आहे.

गॉलब्लेडरमध्ये होतं सिस्ट

पोटाचं दुखणं दाखवण्यासाठी कॅटी डॉक्टरकडे गेली तेव्हा समजलं की, तिच्या पोटात एक सिस्ट आहे. हा सिस्ट हळूहळू कॅन्सरचं रूप घेत आहे. ३२ वर्षीय कॅटीनुसार, ३७ वर्षी पती बेनसोबत संबंध ठेवल्यावर तिला असं वाटत होतं जणू तिच्या पोटात कुणी चाकू मारला. डॉक्टरने लगेच तिच्या गॉलब्लेडरचं स्कॅनिंग केलं. यात त्यांना दिसलं की, यात १० सेमी मोठा ट्यूमर आहे. संबंध ठेवताना या ट्यूमरवर प्रेशर पडत होतं आणि त्यामुळे तिला पोटात दुखत होतं.

सर्जरीनंतर आता रिकव्हर होत आहे कॅटी

सुरूवातीला सकाळच्या वेळी कॅटीचं पोट फुगलेलं दिसत होतं. यानंतर हळूहळू तिच्या पोटाचा गोलाकार वाढत होता. काही लोकांना कॅटी प्रेग्नेंट असल्याचं वाटत होतं. तर काहींना वाटत होतं ती तिचं पोट वाढलं. नोव्हेंबर महिन्यात तिच्या पोटातून सिस्ट काढण्यात आला. कॅटीने सोशल मीडियावर पोस्ट करून लोकांना सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. खासकरून महिलांना चेकअप करत राहण्याचा सल्ला तिने दिला.
 

Web Title: Woman left in pain everytime after physical relation was actually having cyst