Woman hired a private detective to catch husband with sex worker | जोर का झटका! महिलेने खाजगी गुप्तहेर हायर केला अन् दगा देणाऱ्या पतीला रंगेहाथ पकडलं!

जोर का झटका! महिलेने खाजगी गुप्तहेर हायर केला अन् दगा देणाऱ्या पतीला रंगेहाथ पकडलं!

एका महिलेला संशय होता की, तिचा पती तिला दगा देत आहे. अशात महिलेने एक आयडिया केली आणि हे सिद्ध झालं की, तिचा संशय खरा होता. तिने तिच्या पतीला सेक्स वर्करसोबत रंगेहाथ पकडलं. महिलेने स्वत: सांगितलं की, कशाप्रकारे एका खाजगी गुप्तहेराच्या माध्यमातून पतीला पकडलं.

द सनच्या रिपोर्टनुसार ३३ वर्षीय या महिलेने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला की, कशाप्रकारे तिचा संशय खरा ठरला आणि कसं त्याला सेक्स वर्करसोबत पकडलं. महिलेने सांगितले की, हे सगळं तेव्हा सुरू झालं जेव्हा मी त्याला याबाबत मोबाइलवर सर्च करताना पाहिलं. (हे पण वाचा : जेव्हा सिंगल होता तेव्हा बॉडीमुळे खात होता भाव, गर्लफ्रेन्ड मिळाली तर आता झाले असे हाल!)

मोबाइलवर तो याबाबत सर्च करत होता तेव्हाच मी ते पाहिलं होतं. मात्र, तेव्हा त्याने काहीतरी सांगून मला विश्वासात घेतलं. पण मी यावर शोध सुरू ठेवला. यासाठी शेवटी मी एक खाजगी गुप्तहेराची मदत घेतली. मी गुप्तहेराला आपल्या ऑफिसचा टाइम आणि पतीच्या ऑफिसचा टाइम सांगितला. (हे पण वाचा : गर्लफ्रेन्डच्या विचित्र डिमांडने हैराण झाला बॉयफ्रेन्ड, रोजच्या वैतागामुळे एक्सपर्टकडे मदतीसाठी धाव!)

यानंतर गुप्तहेराने फारच प्रोफेशनल पद्धतीने काही दिवस त्याचा पाठलाग केला. एक महिन्यात त्याच्या कारनाम्यांचा खुलासा माझ्यासमोर झाला. गुप्तहेराने हेही सांगितलं की, मी ऑफिसमध्ये गेल्यावर किती तरूणी घरी आल्या. धक्का तर तेव्हा बसला जेव्हा त्याने सेक्स वर्करबाबत सांगितलं.

महिला म्हणाली की, एक दिवसआधीची घटनेबाबत सांगत पुरावे म्हणून काही फोटो दिले. त्यावरून त्याने काय काय केलं हे दिसतं. मी दुसऱ्याच दिवशी ऑफिसला जाताना हे फोटो घरात लावून गेले. जेव्हा महिला ऑफिसमधून घरी परतली तेव्हा तिचा पती एकदम शांत होऊन बसला होता. महिला म्हणाली की, ते फोटो मी त्याच्याकडे भिरकावले. त्यानंतर महिलेने त्याच्यासोबत बोलणंच बंद केलं.

महिला म्हणाली की, माझी आता त्याचा पाठलाग करण्याची आणि त्याच्याबाबत काही वाटण्याची भावना राहिली नाही. मला केवळ एकटेपणा आणि विश्वासघात जाणवतो. मी त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवू शकत नाही. 
 

Web Title: Woman hired a private detective to catch husband with sex worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.