अरेरे! सुंदर दिसण्याची हौस पडली महागात; ओठांचा आकार वाढला अन्...; आता हवंय खरं प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 13:49 IST2023-04-06T13:48:28+5:302023-04-06T13:49:24+5:30

छान दिसण्याच्या नादात तरुणीने जगातील सर्वात मोठे ओठ बनवले आहेत. फिलर्सनंतर फुग्यासारखे ओठ झालेली ही मुलगी आज आयुष्यात वेदना सहन करत आहे.

woman has worlds biggest lips struggling to find love | अरेरे! सुंदर दिसण्याची हौस पडली महागात; ओठांचा आकार वाढला अन्...; आता हवंय खरं प्रेम

फोटो - Instagram/andrea88476

सुंदर दिसावे अशी प्रत्येकाची इच्छा असते, आपण सुंदर दिसावं यासाठी काही जण वाटेल ते करतात. यासाठी मेकअपशिवाय कॉस्मेटिक सर्जरीचाही पर्याय उपलब्ध झाला आहे. सुंदर दिसण्याच्या नादात केलेला भलताच प्रयोग अनेकदा अंगाशी येतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. छान दिसण्याच्या नादात तरुणीने जगातील सर्वात मोठे ओठ बनवले आहेत. फिलर्सनंतर फुग्यासारखे ओठ झालेली ही मुलगी आज आयुष्यात वेदना सहन करत आहे.

एंड्रिया एमिलोवा इवानोवा (Andrea Emilova Ivanova) असं या मुलीचं नाव असून तिचे वय 25 वर्षे आहे. एवढ्या लहान वयात एंड्रियाने तिचे ओठ हायलाइट करण्यासाठी इतके फिलर्स लावले आहेत की ते आता फुग्यासारखे दिसतात. तिला याची काही अडचण नसली तरी तिच्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती तिला सापडत नाही.

20 लाख रुपये केले खर्च 

वेगळं आणि सुंदर दिसण्यासाठी एंड्रियाने 8-10 नव्हे तर एकूण 43 ब्युटी प्रोसिजर केल्या आहेत आणि त्यासाठी 20 लाख रुपये खर्च केले आहेत. एंड्रियाचे ओठ जगातील सर्वात मोठे ओठ आहेत, तरीही तिला ते आणखी मोठे करायचे आहेत. ती तिच्या गालाची हाडे टोन करण्यासाठी 4 हायलुरोनिक एसिड इंजेक्शन्स देखील घेणार आहे. तिला प्रेमाच्या बाबतीत यश मिळाले नाही.

खरं प्रेम सापडत नाही...

डेली स्टारच्या वृत्तानुसार, एंड्रियाचे म्हणणे आहे की, अनेक पुरुषांना तिचे दिसणे विचित्र वाटते, परंतु अनेकांना हे आवडतं. ऑनलाइन तिला डेटिंग, पैसे, सहली असे अनेक प्रस्ताव येतात पण ती प्रेमाची वाट पाहत असते. आता ती एका रिअॅलिटी शोच्या माध्यमातून तिचे प्रेम शोधणार आहे. तिचे म्हणणे आहे की, यापूर्वी अनेकदा तिचे हृदय तुटले आहे, परंतु आता तिच्याकडे लग्नाचे प्रस्ताव येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. ट

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: woman has worlds biggest lips struggling to find love