हे तर काहीतरी भलतच! ही महिला म्हणतेय, सँडविचने हिला केलं प्रेग्ननंट, निघाली पाच महिन्यांची गर्भवती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 04:06 PM2021-08-12T16:06:40+5:302021-08-12T16:08:27+5:30

एका महिलनेनं तिच्या प्रेग्नन्सीबाबत धक्कादायक दावा केलाय. ती म्हणते, की सँडविच खाल्ल्यानंतर ती गरोदर झाली (Woman Gets Pregnant After Eating Sandwich) . या महिलेनं लिहिलं, की सँडविचनं तिला पाच महिन्यांची गर्भवती केलं.

woman got pregnant after eating sandwich, know what happens next | हे तर काहीतरी भलतच! ही महिला म्हणतेय, सँडविचने हिला केलं प्रेग्ननंट, निघाली पाच महिन्यांची गर्भवती

हे तर काहीतरी भलतच! ही महिला म्हणतेय, सँडविचने हिला केलं प्रेग्ननंट, निघाली पाच महिन्यांची गर्भवती

Next

मातृत्व ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत हळवा कोपरा. आता मातृत्वाच्या या सुखासाठी शारिरक संबध प्रस्थापित करण्याचीच गरज नाही. मात्र एका महिलनेनं तिच्या प्रेग्नन्सीबाबत धक्कादायक दावा केलाय. ती म्हणते, की सँडविच खाल्ल्यानंतर ती गरोदर झाली (Woman Gets Pregnant After Eating Sandwich) . या महिलेनं लिहिलं, की सँडविचनं तिला पाच महिन्यांची गर्भवती केलं.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील एका महिलेनं दावा केला आहे. आता सोशल मीडियावर हे प्रकरण चर्चेचा विषय ठरलं आहे. यात पुढची घटना तर आणखीच मजेशीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियातील (California) जॅस्मिन मिलेर (Jasmine Miller) हिनं आपलं आवडतं सँडविच ऑर्डर केलं होतं. हे सँडविच खाल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या आईनं तिच्याकडे पाहून म्हटलं, की तुझं पोट फार मोठं आणि बाहेर आल्यासारखं दिसत आहे. सँडविच खाल्ल्यामुळे असं झालं असावं असं त्यांनी गृहीत धरलं. मात्र, जॅस्मिननं मस्करीत हसत असं म्हटलं, की सँडविच खाल्ल्यानं ती गरोदर राहिली आहे आणि प्रेग्नेंसी किट घेऊन ती आपली टेस्ट करू लागली. पण टेस्ट केल्यानंतर जॅस्मिन आणि तिची आई दोघीही हैराण झाल्या.

जॅस्मिन पाच महिन्यांची गर्भवती होती, मात्र याबाबत काहीही तिला समजलं नाही. याचं कारण होतं, ती घेत असलेल्या बर्थ कंट्रोल पिल्स. बऱ्याच काळापासून ती बर्थ कंट्रोल पिल्स घेत होती. यामुळे तिला पीरियड्स येत नव्हते. जॅस्मिननं सांगितलं, की तिला एक बॉयफ्रेंड आहे, मात्र त्या दोघांनी कुटुंबाबाबत काहीही प्लॅनिंग केलेलं नाही. मात्र, अचानक मिळालेल्या या बातमीमुळे दोघांनाही धक्का बसला. परंतु नंतर दोघांनीही हे एक्सेप्ट केलं आणि आता ते आपली मुलगी लाइटोन हिच्यासोबत राहतात.

जॅस्मिनला पाच महिन्यांनंतर तिच्या गरोदरपणाबद्दल समजलं होतं. यामुळे ती गर्भपात करू शकत नव्हती. त्यामुळे, या टेस्टनंतर जॅस्मिन आणि तिच्या आईनं प्रेग्नेंसीबाबतचे प्रिकॉशन घ्यायला सुरुवात केली. यानंतर दोन महिन्यातच बाळाचा जन्म झाला. प्री मॅच्युअर असल्यानं बाळाला बरेच दिवस आयसीयूमध्ये ठेवलं गेलं. आता जॅस्मिन आपल्या मुलीसोबत आईच्या घरी आली आहे.

Web Title: woman got pregnant after eating sandwich, know what happens next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.