पतीने कौतुक केलं नाही म्हणून पत्नीने दिली 'अशी' शिक्षा, वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 14:48 IST2024-07-03T14:35:33+5:302024-07-03T14:48:16+5:30

एका महिलेने पती तिचं कौतुक करत नाही म्हणून खतरनाक शिक्षा दिली. ज्यात त्याचा जीवही गेला असता.

Woman gives slow poison to husband the reason will shock you | पतीने कौतुक केलं नाही म्हणून पत्नीने दिली 'अशी' शिक्षा, वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

पतीने कौतुक केलं नाही म्हणून पत्नीने दिली 'अशी' शिक्षा, वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

जगभरातून पती-पत्नीतील भांडणाच्या किंवा वादाच्या अशा अशा घटना समोर येत असतात ज्या हैराण करणाऱ्या असतात. काही दिवसांआधीच एका गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला कोर्टात खेचलं होतं कारण त्याने तिला एअरपोर्टला सोडलं नाही. आता तर एक त्याहून भयानक घटना समोर आली आहे. पती कौतुक करत नाही म्हणून एका पत्नीने असं काही केलं ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल.

पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकलेलं असतं. छोटे-मोठे वाद होत असतात. पण समजदार लोक हे वाद विसरून पुन्हा आनंदाने राहतात. पण एका महिलेने पती तिचं कौतुक करत नाही म्हणून खतरनाक शिक्षा दिली. ज्यात त्याचा जीवही गेला असता.

ही घटना अमेरिकेच्या मिसोरी शहरातील आहे. महिलेने सांगितलं की, पती कौतुक करत नाही म्हणून तिने त्याला स्लो पॉयझन देणं सुरू केलं होतं. महिलेने पतीच्या ५०व्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. पण पार्टीनंतर पतीने तिचं कौतुकच केलं नाही. शिवाय काही बोललाही नाही. याचा तिला अपमान वाटला म्हणून तिने पतीच्या कोल्ड ड्रिंकमध्ये ‘राउंड अप’ नावाचं कीटकनाशक औषध टाकलं होतं. 

एका रिपोर्टनुसार, पतीला एक दिवस फ्रिजमध्ये ठेवलेल्या कोल्ड ड्रिंकची टेस्ट जरा वेगळी वाटली. हे पिताच त्याची तब्येत बिघडली. अशात पतीने सीसीटीव्ही कॅमेरा चेक करण्याचं ठरवलं.

जेव्हा त्याने फुटेज पाहिलं तर त्याला धक्का बसला. पत्नी सोडाची बॉटल आणि कीडकनाशकाच्या बॉटलसोबत काहीतरी करताना दिसली. पतीने लगेच काउंटी शेरिफ ऑफिसमध्ये याबाबत तक्रार केली. 

व्यक्तीने सांगितलं की, पत्नी त्याच्या ५ लाख डॉलरच्या लाइफ इन्शुरन्स पॉलिसीसाठी त्याला मारण्याच्या प्रयत्नात आहे. पण पोलिसांनी जेव्हा पत्नीची चौकशी केली तर वेगळंच कारण समोर आलं. पत्नीने सांगितलं की, तिने पतीसाठी वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. यासाठी पतीने तिचं अजिबात कौतुक केलं नाही. त्यामुळे तिने त्याला अशी शिक्षा दिली.

Web Title: Woman gives slow poison to husband the reason will shock you