परिक्षा हॉलमध्ये जाताच सुरू झाल्या प्रसृती कळा, आधी दिला बाळाला जन्म मग माऊलीने पेपर पूर्ण केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 18:20 IST2020-10-13T18:03:08+5:302020-10-13T18:20:09+5:30
परिक्षा सुरू होण्याच्या आधीच एक अनपेक्षित प्रकार घडला.

परिक्षा हॉलमध्ये जाताच सुरू झाल्या प्रसृती कळा, आधी दिला बाळाला जन्म मग माऊलीने पेपर पूर्ण केला
स्त्रीशक्ती नेहमीच वेगवेगळ्या प्रसंगातून जगासमोर येत असते. तिची सहनशीलता आणि कर्तृत्व यांच्या जोरावर जगातील कोणतंही अशक्य असं काम ती करू शकते. सध्या सोशल मीडियावर एका प्रेरणादायी महिलेची कहाणी व्हायरल होत आहे. ही घटना वाचून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. अमेरिकेतील इलियॉन येथिल रहिवासी असलेली ब्रायना हिल ही महिला परीक्षेसाठी परिक्षा केंद्रावर पोहोचली. परिक्षा सुरू होण्याच्या आधीच एक अनपेक्षित प्रकार घडला.
ब्रायना ही शिकागो लॉ स्कूलमधून वकीलीची परीक्षा देत होती. परिक्षा हॉलमध्ये शिरताच तिला प्रसृतीकळा सुरू झाल्या. सीएनएननं दिलेल्या रिपोर्टनुसार, ब्रायनाला पेपर सुरू होण्याच्या ३० मिनिटंआधीच या वेदना सुरू झाल्या होत्या. वेदना होत असतानाच ब्रायना पेपर सोडवायला बसली. काहीवेळानंतर वेदना असहय्य झाल्याने तिने नवऱ्याला बोलावून घेतले. अरे व्वा! चिमुरडीसह ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी माकडांनीही केली गर्दी, पाहा व्हायरल फोटो
संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास ब्रायनाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री १० वाजता ब्रायनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. दुसऱ्या दिवशी तिचा दुसरा पेपर होता, अखेर विद्यापीठाची परवानगी घेतली त्यानंतर ब्रायनाने रुग्णालयात दुसरा पेपर दिला. यानंतर प्रशासनाचे आणि विद्यापीठाचे मनापासून आभार मानले. या परिक्षेचा निकाल आल्यानंतर या चिमुकलीला भविष्यात आपल्या आईचा नक्की अभिमान वाटेल. बाबो! समुद्रकिनारी सापडला तब्बल १०० किलोंचा दुर्मिळ कासव, अन् मग...., पाहा फोटो