प्रेमाचा कहर! तरुणीने 'नाभी' कापून एक्स बॉयफ्रेन्डला केली गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 14:07 IST2018-10-29T14:02:50+5:302018-10-29T14:07:56+5:30

प्रेमात असलेले व्यक्ती ऐकमेकांना नेहमीच काहीतरी वेगळे गिफ्ट देण्याच्या प्रयत्नात असतात. त्यासाठी ते खूप शोध घेतात.

Woman gifts her belly button to ex boyfriend in gift | प्रेमाचा कहर! तरुणीने 'नाभी' कापून एक्स बॉयफ्रेन्डला केली गिफ्ट

प्रेमाचा कहर! तरुणीने 'नाभी' कापून एक्स बॉयफ्रेन्डला केली गिफ्ट

प्रेमात असलेले व्यक्ती ऐकमेकांना नेहमीच काहीतरी वेगळे गिफ्ट देण्याच्या प्रयत्नात असतात. त्यासाठी ते खूप शोध घेतात. पण एका मुलीने तिच्या एक्स बॉयफ्रेन्डला यूनिक गिफ्ट देण्याबाबत कहरच केलाय. या २३ वर्षीय मुलीने चक्क तिची नाभी तिच्या एक्सला गिफ्ट म्हणून दिली आहे. मेक्सिकोमधील जॅलिस्को येथील ही घटना आहे. तिने त्याला नाभी गिफ्ट करण्याचं कारण सांगितलं की, मनुष्याचा प्रवास या नाभिपासूनच होतो. 

पाउलिना नावाच्या या तरुणीने ऑपरेशन केल्यानंतर तिची नाभी एक्स बॉयफ्रेन्ड डॅनिअल रामेरेडला गिफ्ट म्हणून दिली. एचआर इंटर्न आणि विद्यार्थी असलेल्या या मुलीने सांगितले की, 'माझं आणि माझ्या परिवाराचं कधीच पटलं नाही. मी कधीच त्यांच्या जवळ नव्हते. मला नेहमीच त्यांची काहीना काही अडचण होत होती'. तिने सांगितले की, 'मी रागात होते आणि मला सगळ्यांशी नातं तोडायचं होतं. मला स्वत:ला काहीतरी वादग्रस्त करायचं होतं'.

(Image Crediit : www.dailymail.co.uk)

मिरर यूकेने दिलेल्या वृत्तानुसार, तरुणीने सांगितले की, 'एका तज्ज्ञाकडून मी ही सर्जरी करुन घेतली. डॉक्टरांनी ऑपरेशननंतर फार काळजी घेण्यास सांगितले होते. मला खूप वेदना होत होत्या, मी अनेक दिवस बेडवरच होते. मला अजिबात हलता येत नव्हतं. उभंही राहता येत नव्हतं. हळूहळून मला होणारा त्रास कमी झाला'.

पाउलिनाने सांगितले की, 'मला माझ्या एक्स बॉयफ्रेन्डला प्रेमाचं अमुल्य गिफ्ट द्यायचं होतं. त्यामुळे मी त्याला नाभी गिफ्ट केली. मी आधी माझ्या बॉयफ्रेन्डवर खूप प्रेम करायची. त्याने मला वाईट परिस्थितीत खूप मदत केली आणि तो माझ्या जीवनातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एका आहे. पाउलिनाने सांगितले की, ऑपरेशननंतर मी नाभी एका बॅगेत ठेवली आणि एक लेटरही लिहिलं. आता आम्ही केवळ चांगले मित्र आहोत. 

Web Title: Woman gifts her belly button to ex boyfriend in gift