बिल गेट्स ठरले 'या' मुलीसाठी सिक्रेट सांता, जाणून घ्या काय दिलं गिफ्ट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 18:05 IST2019-12-26T18:01:17+5:302019-12-26T18:05:46+5:30
सध्या ख्रिसमसचा सण सुरू असल्यामुळे प्रत्येकाला उत्सुकता असते की आपल्यासाठी सिक्रेट सांता कोण असणार.

बिल गेट्स ठरले 'या' मुलीसाठी सिक्रेट सांता, जाणून घ्या काय दिलं गिफ्ट...
सध्या ख्रिसमसचा सण सुरू असल्यामुळे प्रत्येकाला उत्सुकता असते की आपल्यासाठी सिक्रेट सांता कोण असणार. तसंच आपल्याला काय नवनवीन गिफ्ट मिळणार असा प्रश्न पडलेला असतो. तुम्ही कधी विचार केलाय का एखाद्या मुलीचा सिक्रेट सांता जर बिल गेट्स असेल तर तिला काय गिफ्ट मिळेल. सिक्रेंट सांता हा असा व्यक्ती असतो ज्याला आपल्याबद्दल काही माहीत नसताना सुध्दा तो आपल्यासाठी गिफ्ट ठेवून जात असतो. जगातील सगळ्यात श्रीमंत लोक हे कोणत्या व्यक्तीचा सांता बनणार ह्याची खूप लोकांना उत्सुकता असते.
अमेरिकेतील एका मुलीचे बिल गेट्स हे सिक्रेट सांता बनले आहेत.‘रेडिट’ या वेबसाईवर बिल गेट्स दर वर्षी सिक्रेट सांता एक्टीव्हीटीमध्ये भाग घेत असतात. अमेरिकेच्या कोलोरोड या ठिकाणी राहत असलेल्या शेल्बी या मुलीचे सिक्रेट सांता बील गेट्ल बनले आहेत.
त्यांनी या लहान मुलीला ३७ किलोचं गिफ्ट दिलं आहे. आणि भव्य अशा ३७ किलोच्या गिफ्टमध्ये अनेक लहान मोठे गिफ्ट आहेत. यात अनेक पुस्तकांची सिरीज होती. एक सांताची टोपीसुद्धा यात होती. या मुलीने सोशल मिडियावर हा फोटो शेअर केला आहे.
शेल्बी या मुलीच्या आईचे निधन काही दिवसांपूर्वी झाले. बिल गेट्स यांनी या मुलीच्या आईच्या नावाने हॉस्पीटलमध्ये निधी दिला आहे. तसंच या मुलीच्या आईच्या नावाने एक चिठ्ठी सुद्दा लिहली आहे. हे सगळे गिफ्टस पाहून शेल्बीला फार आनंद झाला आहे. तसेच तिने या गिफ्टसबद्दल बील गेट्स यांचे आभार मानले आहेत.