Woman finds orange pearl : याला म्हणतात नशीब! फक्त १६३ रूपयांचं जेवण घेऊन ती घरी आली; अन् मिळाला १ कोटीचा मोती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 02:14 PM2021-03-25T14:14:25+5:302021-03-25T14:26:08+5:30

Woman finds orange pearl : एका गरिब महिलेला शंखांमध्ये असं काही सापडलं त्यामुळे ती करोडपती झाली आहे. या महिलेला शंखात एक केशरी रंगाचा  मोती मिळाला.  तुमचा विश्वास बसणार पण या मोत्याची किंमत करोडो रुपये आहे.

Woman finds orange pearl : Woman finds orange pearl worth crores news from thailand | Woman finds orange pearl : याला म्हणतात नशीब! फक्त १६३ रूपयांचं जेवण घेऊन ती घरी आली; अन् मिळाला १ कोटीचा मोती

Woman finds orange pearl : याला म्हणतात नशीब! फक्त १६३ रूपयांचं जेवण घेऊन ती घरी आली; अन् मिळाला १ कोटीचा मोती

Next

नशिब कधी चमकेल काही सांगता येत नाही आणि ज्याचं नशिब चमकतं त्याला हे झालं तरी कसं? याबाबत विश्वासच बसत नाही. अशीच घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका गरिब महिलेचं  नशीब रातोरात पालटलं आहे. थायलँडच्या एका गरिब महिलेला जेवणाची तयारी करतानाच  जणूकाही लॉटरी लागली. थायलँडच्या एका गरिब महिलेला शंखांमध्ये असं काही सापडलं त्यामुळे ती करोडपती झाली आहे. या महिलेला शंखात एक केशरी रंगाचा  मोती मिळाला.  तुमचा विश्वास बसणार पण या मोत्याची किंमत करोडो रुपये आहे.

मिररनं दिलेल्या माहितीनुसार Kodchakorn Tantiwiwatkul नावाच्या महिलेनं  ७० भाट म्हणजेच   १६३ रूपयांना मासे आणि शंख विकत घेतलं होतं.  तेव्हा या बाईनं (sea snails) शंख विकत घेतले आणि घरी जाऊन  कापायला सुरूवात केली.  त्यात तिला एक वस्तू मिळाली. सुरूवातीला या महिलेला जो मोती शंखात अडकला आहे तो सामान्य असावा असं वाटलं. पण जेव्हा या महिलेनं हा दगड नीट पाहिला तेव्हा कळलं की, हा ऑरेंज मेलो मोती असून १.५ सेमीचा हा मोती आहे.

भारीच! लॉटरी एजंट महिलेचा प्रमाणिकपणा; तिकिटाचे २०० रूपये देताच पठ्या जिंकला ६ कोटींचा जॅकपॉट

Kodchakorn या महिलेनं दिलेल्या माहितीनुसार सुरूवातीला या तिला याबाबत माहिती दिली नव्हती.  मार्केटमधले लोक तिच्याकडून हा मोती परत मागतील असं  वाटलं होतं.  तिनं सांगितले की, '' ३० जानेवारीला मला हा मोती मिळाला. आईचे उपचार करण्यासाठी मला हा मोती विकावा लागणार आहे. कारण माझी आई कॅन्सरचा सामना करत आहे. तिच्या उपचारांसाठी पैश्याची आवश्यकता आहे. तसंच माझे वडिलही आजारी असतात. ''  

तिच्यासाठी 'त्याने' चक्क कापल्या हाताच्या नसा! तरुणाची विवाहित महिलेवर जबरदस्ती

हा खूप दुर्मिळ मोती असून एका उद्योगपतींनी या मोतीची २५००० यूरो म्हणजेच  २१ लाख रूपयांच्या जवळपास या मोत्याची किंमत लावली आहे. पण या महिलेनं या किमतीत हा मोती विकण्यास नकार दिला आहे. अजूनही  तीन चार उद्योगपतींना या महिलेला मोती विकण्याची ऑफर दिली होती. पण जोपर्यंत योग्य किंमत मिळत नाही तोपर्यंत मोती विकण्यास या महिलेनं आणि तिच्या कुटुंबानं नकार दिला आहे. 

Web Title: Woman finds orange pearl : Woman finds orange pearl worth crores news from thailand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.