ऐकावं ते नवलच! काहीच काम न करता 'ही' महिला झाली करोडपती; कारण ऐकून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 15:21 IST2021-12-21T15:20:17+5:302021-12-21T15:21:45+5:30
कोणतंही काम न करता एक महिला करोडपती झाली आहे. ती बक्कळ पैसा कमवत असून तिचा कमाईचा मार्ग ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.

ऐकावं ते नवलच! काहीच काम न करता 'ही' महिला झाली करोडपती; कारण ऐकून बसेल धक्का
जगभरात विविध स्वभावाचे लोक असतात. प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असते. अनेकाचे छंद काही वेगळेच असतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. कोणतंही काम न करता एक महिला करोडपती झाली आहे. ती बक्कळ पैसा कमवत असून तिचा कमाईचा मार्ग ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. डायमंड डीवा प्रिंसेस (Diamond Diva Princess) या नावाने ही महिला प्रसिद्ध आहे. नटण्याथटण्यात आणि फिरण्यातच ती लाखो रुपये खर्च करते. बरेच अनोळखी पुरुष तिच्यावर पैसे खर्च करतात.
डायमंड नावाची ही महिला एक फिनडोम (FinDomme) आहे. फिनडोम महिला फायनेशियल डॉमिनेशचं (Financial Domination) काम करतात. म्हणजे श्रीमंत पुरुषांच्या पैशांवर ती हक्क दाखवते आणि जबरदस्ती त्यांचे पैसे लुटते. बऱ्याच श्रीमंत पुरुषांना अशा महिला आवडतात. अशा महिलांवर ते लाखो रुपये उडवतात. याबदल्यात त्यांना तिच्याशी संबंध ठेवायचा असतो किंवा त्यांना तिच्याकडून काहीच नको असतं. अशीच सवय असलेल्या किंवा असा छंद असलेल्या पुरुषांचा ही महिला फायदा घेते.
द सनच्या रिपोर्टनुसार, डायमंड अशाच 7 हजार अनोळखी श्रीमंत लोकांकडून पैसे लुटते, ज्यांना तिला फक्त सुंदर दिसलेलं पाहायचं आहे. आपलं खरं नाव न सांगता 2004 पासून ती फिनडोम म्हणून काम करत आहे. याआधी ती मॉडेल होती. अमेरिकन अभिनेत्री मर्लिन मुनरोशी लोक तिची तुलना करतात. लोकांच्या पैशांवर हक्क दाखवते आणि त्यांना आपण असे दबलेल्या राहण्यातच आनंद वाटतो. या बदल्यात ते डायमंडला लाखो रुपये पाठवत असतात. आपल्या क्लाइंट्ससाठी ती वेगवेगळे फेस्टिव्हल्स ठेवते. 1 नोव्हेंबर ते 2 जानेवारी ती डायमंड प्रिसेसमस नावाचं ख्रिसमससारखं एक फेस्टिव्हल ठेवते.
ज्यामध्ये पुरुष तिला गिफ्ट देतात. लोकांना आपल्यावर पैसे उडवायला मजा वाटते असं ती म्हणते. फेस्टिव्हल्सदरम्यान ती आपल्या क्लाइंट्ससाठी वेगवेगळे दिवस साजरे करते. ज्यात तिला लोक वेगवेगळ्या वस्तू गिफ्ट करतात. एका व्यक्तीने तर तिच्यासाठी लास वेगासची 19 लाख रुपयांची एक ट्रिप स्पॉन्सर केली होती. आपल्या एका डिनरसाठी ती 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे उडवते. त्या पुरुषांसाठी ती महागड्या ड्रेसमध्ये नटूनथटून राहते आणि आपले सुंदर फोटो, व्हिडीओ पोस्ट करते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.