पती आंघोळ करत नाही म्हणून पत्नीने मागितला घटस्फोट, जाणून घ्या काय आहे भानगड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 13:15 IST2024-02-05T13:14:25+5:302024-02-05T13:15:29+5:30

पत्नीने त्याच्याविरोधात कोर्टात केस दाखल केली आहे. तसेच त्याच्याकडून घटस्फोट मागितला.

Woman files divorce case against husband for not bath clean teeth enough | पती आंघोळ करत नाही म्हणून पत्नीने मागितला घटस्फोट, जाणून घ्या काय आहे भानगड!

पती आंघोळ करत नाही म्हणून पत्नीने मागितला घटस्फोट, जाणून घ्या काय आहे भानगड!

पती-पत्नींमध्ये नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी वाद होत असतात. अनेक हे वाद इतके वाढतात की, नातं तुटण्याचीही वेळ येते. याची कारणे अनेकदा हैराण करणारी असतात. असंच एक कारण समोर आलं आहे तेही तुर्कीमधून. इथे एका महिलेने पतीकडून केवळ या कारणाने घटस्फोटाची मागणी केली कारण तो रोज आंघोळ करत नाही आणि ब्रश करत नव्हता. पत्नीने त्याच्याविरोधात कोर्टात केस दाखल केली आहे. तसेच त्याच्याकडून घटस्फोट मागितला. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केवल ए.वाई. नावाच्या या महिलेने दावा केला की, तिचा पती कधीच आंघोळ करत नाही. तो पाच-पाच दिवस एकच कपडे घालतो. तीन-चार दिवस ब्रश करत नाही. ज्यामुळे त्याच्या शरीरातून दुर्गंधी येते. त्याच्यासोबत राहणं अवघड आहे. त्याच्यासोबत काम करणाऱ्या लोकांनीही जबाब दिले आहेत की, त्याच्या घामाच्या वासामुळे त्याच्यासोबत काम करणं अवघड होतं.

महिलेच्या परिवाराने फॅमिली कोर्टात केस दाखल केली आहे आणि घटस्फोटाची मागणी केली आहे. महिलेने पतीविरोधात कोर्टात साक्षीदारही सादर केले आहेत. परिसरातील लोक आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या लोकांना कोर्टात बोलवलं आहे. या लोकांनीही कोर्टात सांगितलं की, तो खरंच फार घाणेरडा राहतो. 

दोन्हीकडील बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने घटस्फोटाला मंजूरी दिली आहे. सोबत घाणेरडा राहत असल्याने पतीला ऐकवण्यातही आलं. तसेच नुकसान भरपाई म्हणून पत्नीला 500,000 टर्किश लीरा म्हणजे साधारण 13.69 लाख रुपये देण्याचा आदेशही दिला आहे. 

Web Title: Woman files divorce case against husband for not bath clean teeth enough