मुलीच्या 23 वर्षीय मैत्रिणीसोबत वडिलांचं अफेअर, मुलीने शेअर केली तिची कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 10:04 IST2024-02-21T10:04:18+5:302024-02-21T10:04:46+5:30

तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर ही कहाणी शेअर केली. जोनीने सांगितलं की, माझ्या मैत्रिणीचं माझ्या वडिलांसोबत अफेअर होतं.

Woman exposes fathers affair with best friend 23 year old on social media | मुलीच्या 23 वर्षीय मैत्रिणीसोबत वडिलांचं अफेअर, मुलीने शेअर केली तिची कहाणी...

मुलीच्या 23 वर्षीय मैत्रिणीसोबत वडिलांचं अफेअर, मुलीने शेअर केली तिची कहाणी...

एका तरूणीने तिचे वडील आणि तिच्या मैत्रिणीच्या रिलेशनशिपचा खुलासा केला आहे. ती म्हणाली की, जेव्हा तिला याबाबत समजलं तेव्हा तिला धक्का बसला. जोनी विलकॉक्स नावाच्या तरूणीने सांगितलं की, तिची मैत्रीण आणि वडिलांची भेट पाच महिन्यांआधी झाली होती. तिची मैत्रीण गर्भवती झाली. तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर ही कहाणी शेअर केली. जोनीने सांगितलं की, माझ्या मैत्रिणीचं माझ्या वडिलांसोबत अफेअर होतं.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, जोनीच्या व्हिडिओला आतापर्यंत 8 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्यानंतर तिने पोस्ट डिलीट केली होती. जोनीने व्हिडिओत सांगितलं की, माझी मैत्रीण 23  वर्षांची आहे आणि वडिलांचं वय 49 आहे. माझ्या वडिलांनी तिला गर्भवती केलं. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या जोनीने ही कहाणी शेअर केल्यावर लोकही हैराण झाले. ती पुढे म्हणाली की, हे ऐकायला फार अजब वाटतं. त्यांच्या नात्याला आता दोन वर्ष झाली आहेत. ती पैशांच्या मागे आहे. 

ही कहाणी समोर आल्यावर तिघांना एका शोमध्येही बोलवण्यात आलं. यात जोनी आपल्या वडिलांबाबत म्हणाली की, जर त्यांना कमी वयाच्या मुली पसंत आहेत तर दुसऱ्या कुणाला डेट करायला हवं होतं. माझ्या मैत्रिणीसोबतच हे का केलं. जोनीची मैत्रीण गीनाने या नात्याच्या बचाव केला. ती म्हणाली की, यात कुणीही काही बोलण्याचं कारण नाही. मी तिच्या वडिलांचे पैसे वापरत नाहीये. मी पैशांसाठी या नात्यात नाही. आमचं नातं फार चांगलं आहे. मी डेविडसोबत राहण्यासाठी तयार आहे. आमचं एक बाळही आहे. याचा अर्थ असा होतो की, आमचं नातं सीरिअस आहे.

तेच जोनीचे वडील डेविडने आपली चूक मान्य केली. त्याने हे मान्य केलं की, जोनीला यामुळे त्रास झाला असेल. तो म्हणाला की, हे मी मान्य करतो की, इथे काहीतरी सीमा असायला हवी, तिच्या मैत्रिणींना डेट न करण्याची. पण मला माझं अशा व्यक्तीसोबत रोमॅंटिक पद्धतीने जगायचं आहे, ज्याच्यासोबत मी आहे. 

Web Title: Woman exposes fathers affair with best friend 23 year old on social media