भव्य मंडप अन् ढोल-ताशांच्या गजरात स्वागत...पाळीव कुत्र्याचा जल्लोषात वाढदिवस साजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 20:59 IST2025-01-06T20:57:59+5:302025-01-06T20:59:53+5:30
सपना सोना नावाच्या महिलेने आपल्या लाडक्या कुत्र्याच्या वाढदिवसासाठी 300 पाहुण्यांना आमंत्रित केले होते.

भव्य मंडप अन् ढोल-ताशांच्या गजरात स्वागत...पाळीव कुत्र्याचा जल्लोषात वाढदिवस साजरा
Dog Birthday : आजकाल पाळीव प्राण्यांचा वाढदिवस साजरा करण्याची क्रेझ निघाली आहे. अनेकजण आपल्या घरातील कुत्रा, मांजराचा वाढदिवस साजरा करताना दिसतात. झारखंडमधील जमशेदपूरमध्ये असेच प्रकरण समोर आले आहे. एका महिलेने आपल्या कुत्र्याचा भव्य-दिव्य वाढदिवस साजरा केला. यासाठी तिने 300 लोकांना आमंत्रित केले होते. प्रत्येकाने आपल्यासोबत भेटवस्तूही आणल्या होत्या. एका भव्य मंडपात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सपना सोना नावाची महिला आपल्या कुत्र्यावर खूप प्रेम करते. ती या रोझ नावाच्या पाळीव कुत्र्याला आपली मुलगी मानते. रोजच्या वाढदिवसासाठी तिने खूप मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी मंडप टाकण्यात आला, 300 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले. सपना सोनाने रोझला ओवाळल्यानंतर केक कटिंग सोहळाही पार पडला.
परिसरात सौर दिवे लावा
रोझचा वाढदिवस खास बनवण्यासाठी सपना सोना यांनी सामाजिक कार्यदेखील केले. त्यांनी बिस्तुपूर येथील पार्वती घाट आणि परिसरात सौर दिवे लावले आणि आश्रमात राहणाऱ्या लोकांना अन्नदानही केले. यावेळी पार्टीला आलेल्या पाहुण्यांसाठीदेखील हा अनोखा अनुभव होता.