येड्याचा बाजार; 'ती'नं 'त्याचं' घर का जाळलं हे वाचून कपाळावर हात नाही मारलात तर शप्पथ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 14:44 IST2019-08-21T14:40:00+5:302019-08-21T14:44:58+5:30

जगभरात दररोज अशा विचित्र घटना घडत असतात की, त्यांवर विश्वास ठेवणेही कठीण होतं. अमेरिकेतील न्यू जर्सीमध्येही अशीच एक विचित्र घटना घडली.

Woman burns down mans house after he called her for sex at 4 am but fell asleep | येड्याचा बाजार; 'ती'नं 'त्याचं' घर का जाळलं हे वाचून कपाळावर हात नाही मारलात तर शप्पथ!

येड्याचा बाजार; 'ती'नं 'त्याचं' घर का जाळलं हे वाचून कपाळावर हात नाही मारलात तर शप्पथ!

जगभरात दररोज अशा कितीतरी विचित्र घटना घडत असतात की, त्यांवर विश्वास ठेवणेही कठीण होतं. अमेरिकेतील न्यू जर्सीमध्येही अशीच एक विचित्र घटना घडली. इथे एका तरूणाने तरूणीला सकाळी ४ वाजता शारीरिक संबंधासाठी घरी बोलवलं होतं. आता तुम्ही म्हणाल यात काय विचित्र? तर त्याने बोलवण्यापर्यंत सगळं ठीक होतं. पण त्यानंतर जे घडलं ते वाचून तुम्हालाही धक्का बसेल.

तरूणाने तरूणीला मेसेज करून सकाळी ४ वाजता शारीरिक संबंधासाठी घरी बोलवले खरे. पण तो बराच वेळ झोपेतूनच उठला नाही. तरूणीने बराचवेळी दरवाज्यासमोर उभी पाहून तरूणाची झोपेतून उठण्याची वाट पाहिली. अखेर तिचा रागाचा बांध फुटला आणि तिने तरूणाच्या घराला आग लावली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या २९ वर्षीय तरूणीचं नाव Taija Russel आहे. Taija Russel ने घर जाळण्यापूर्वी एका अज्ञात व्यक्तीला रागाच्या भरात अनेक मेसेज पाठवले होते.

(Image Credit : www.dailymail.co.uk)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Taija Russel आग लावून तेथून पसार झाली. तर घरात झोपला असलेल्या तरूणाची झोप ४.३० वाजता उघडली. झोपेतून उठल्यावर त्याने पाहिले की, सगळीकडे आगच आग आहे. घरातून बाहेर पडण्याचे सगळे मार्ग बंद आहेत. तो कसाबसा खिडकीची काच तोडून बाहेर पडण्यात यशस्वी ठरला. घराबाहेर पडताच तो धावत-धावत २ मैल दूर असलेल्या Woodbury पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. त्याने घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना सगळी माहिती दिली आणि पुन्हा घराकडे धावत सुटला.

काही वेळातच फायर फायटर्स तिथे पोहोचले आणि त्यांनी आग विझवली. विचारपूस केल्यावर तरूणाने पोलिसांना सांगितले की, त्याने सकाळी ४ वाजता Russel ला घरी बोलवले होते. नंतर सीसीटीव्ही फुटेज तपासलं तर त्यात Russel घराला आग लावताना दिसली. पोलिसांनी लगेच Russel ला ताब्यात घेतले आणि तिच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय.

Web Title: Woman burns down mans house after he called her for sex at 4 am but fell asleep