बोंबला! २ कोटींची अंगठी घेऊन तरूणीने दिला फाटा, कोण आहे 'हा' मजनू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 17:31 IST2020-01-01T17:31:33+5:302020-01-01T17:31:40+5:30

एका मुलीने चक्क २ कोटी रूपयांची अंगठी स्वीकारून मुलाचे प्रपोजल नाकारलं आहे.

Woman accepts engagement ring and turn down proposal | बोंबला! २ कोटींची अंगठी घेऊन तरूणीने दिला फाटा, कोण आहे 'हा' मजनू?

बोंबला! २ कोटींची अंगठी घेऊन तरूणीने दिला फाटा, कोण आहे 'हा' मजनू?

एका मुलीने चक्क २ कोटी रूपयांची अंगठी  स्वीकारून मुलाचे प्रपोजल नाकारलं आहे. डेलीमेलच्या वृत्तानूसार हा प्रसंग लंडन या ठिकाणी घडला आहे. लंडनमध्ये राहत असलेल्या सोशलाईट आणि मॉडल क्रोनिन हिच्यासमोर एका अनोळखी व्यक्तीने प्रस्ताव ठेवला होता. या मुलीचे नाव अमंडा आहे.  हा प्रस्ताव रिलेशनशीप ठेवण्याबद्दल होता. हे दोघं पहिल्यांदा न्यूर्याकच्या एका हॉटेलमध्ये भेटले.

अमंडाने असं सांगितले की तो व्यक्ती तिच्या प्रेमात होता. त्यांची ओळख झाल्यानंतर त्यांनी फोननंबर एकमेकांना दिले . त्यानंतर त्या मुलाने तिला प्रेमाचे मॅसेज पाठवायला सुरूवात केली. नंतर अमंडाला माहित झाले की त्या व्यक्तीचे लग्न झाले आहे.  नंतर अमंडाने त्या व्यक्तीला टाळायला सुरूवात केली.

पण तो व्यक्ती आधी झालेले लग्न तोडण्यासाठी तयार आहे. असं त्याने सांगितले.  त्यानंतर त्याने अमंडाला प्रपोज केले. त्यानंतर जेव्हा अमंडा त्या व्यक्तीला भेटली. तेव्हा त्याने तीला महागडी अंगठी भेट म्हणून दिली. पूढे अमंडा असं सांगते की मला ती अंगठी नको होती. पण त्या व्यक्तीच्या आग्रहाखातर तिने ही भेट स्वीकारली. 

सध्याच्या काळात अमंडा कॅनडातील  एका मुलाला डेट करत आहे. पण अमंडाने पार्टनरच्या नावाचा खूलासा केलेला नाही. त्या अनोळखी व्यक्तीने अमंडाला Van Cleef & Arpels या ब्रॅण्डची अंगठी दिली आहे.  अंगठी भेट म्हणून देणारा व्यक्ती युरोपच्या श्रीमंत लोकांपैकी एक आहे.  या अंगठीची किंमत २ कोटी रुपये आहे.

Web Title: Woman accepts engagement ring and turn down proposal