पत्नीला प्लॅस्टिकमध्ये बांधुन केला वर्ल्ड रेकॉर्ड, नेटीझन्स म्हणाले...पति असावा तर असा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 22:01 IST2021-06-30T22:00:37+5:302021-06-30T22:01:09+5:30

कशाकशाचे वर्ल्ड रेकॉर्ड बनू शकतात याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. हेच पाहा ना, एका अवलियाने आपल्या पत्नीला कमी वेळात प्लॅस्टिक पेपरमध्ये व्रॅप करण्याचा गीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तुम्हाला खरं वाटत नाहीयेना मग वाचा पुढे...

Wife tied in plastic world record, netizens said ... there should be a husband like this | पत्नीला प्लॅस्टिकमध्ये बांधुन केला वर्ल्ड रेकॉर्ड, नेटीझन्स म्हणाले...पति असावा तर असा

पत्नीला प्लॅस्टिकमध्ये बांधुन केला वर्ल्ड रेकॉर्ड, नेटीझन्स म्हणाले...पति असावा तर असा

कशाकशाचे वर्ल्ड रेकॉर्ड बनू शकतात याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. हेच पाहा ना, एका अवलियाने आपल्या पत्नीला कमी वेळात प्लॅस्टिक पेपरमध्ये व्रॅप करण्याचा गीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तुम्हाला खरं वाटत नाहीयेना मग वाचा पुढे...
युपीआय डॉट कॉम अनुसार अमेरिकेतल्या इडाहो शहरातील डेविड रश यांनी त्यांच्या पत्नीला १ मिनिट २. ४४ सेकंदामध्ये प्लॅस्टिकमध्ये व्रॅप केले. डेविड रश यांनी याआधीही वेगवेगळे १५० वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. डेविड याने मुळ रेकॉर्ड २०१९ मध्ये केला होता ज्यात त्याने त्याची पत्नी जेनिफर हिला १ मिनिट ५७ सेंकदात प्लॅस्टिक गुंडाळले होते.

आता त्यांनी त्यांचाच रेकॉर्ड मोडला आहे. त्यांनी यावेळी नवी टेक्निक निवडली तसेच त्यांना यासाठी ९ प्लॅस्टिकचे रिळ लागले. त्याने हातापायासकट सर्व शरीर व्रॅप केले. अनेकजण त्यांच्या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. काही जण म्हणत आहेत पती असावा तर असा.

Web Title: Wife tied in plastic world record, netizens said ... there should be a husband like this