पतीच्या सततच्या टोमण्याला कंटाळून पत्नीने शिकवला धडा, दातांनीच तोडला त्याच्या जीभेचा लचका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 16:49 IST2022-05-05T16:48:57+5:302022-05-05T16:49:22+5:30
Uttar Pradesh : ही घटना शीशगढ भागातील बल्ली गावातील आहे. पीडित श्रीपाल मौर्यने एक वर्षाआधी बिहारमधील एका तरूणीसोबत लग्न केलं होतं.

पतीच्या सततच्या टोमण्याला कंटाळून पत्नीने शिकवला धडा, दातांनीच तोडला त्याच्या जीभेचा लचका
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेलीमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने दातांनी तिच्या जिभेचा लचका तोडला. या घटनेनंतर पीडित व्यक्तीला बरेलीच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याची स्थिती गंभीर आहे. असं सांगितलं जात आहे की, पती पत्नीला ती बोलू शकत नसल्याने मुकी असल्याचा सतत टोमणा मारत होता. ज्यानंतर रागाच्या भरात पत्नीने पतीच्या जीभेचा तिच्या दातानेच लचका तोडला.
ही घटना शीशगढ भागातील बल्ली गावातील आहे. पीडित श्रीपाल मौर्यने एक वर्षाआधी बिहारमधील एका तरूणीसोबत लग्न केलं होतं. तरूणाची पत्नी दिव्यांग आहे जी बोलू शकत नाही. ज्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते. श्रीपाल आपल्या पत्नीवर यावरून नेहमीच टोमणे मारत होता.
बुधवारी सायंकाळी मजुरी करून आल्यावर थकव्यामुळे लवकर झोपला होता. तेव्हाच पत्नीने दातांनी त्याच्या जिभेचा तुकडा पाडला. ज्यानंतर तो रक्ताने माखला होता. तो जोरात ओरडल्याने घरातील लोक आणि आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनीच त्याला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. जिथे त्याची स्थिती गंभीर आहे. या घटनेची पोलिसात तक्रार दिली गेली नाही. पण सध्या या विषयाची चर्चा परिसरात रंगली आहे.