बोंबला! पतीने भांडी घासली नाही म्हणून पत्नीने बोलवले पोलीस, महिलेच्या एका प्रश्नाने पोलीस हसून हसून लोटपोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:57 IST2026-03-20T12:57:29+5:302026-03-20T12:57:52+5:30

Husband - Wife Fight : नवरा - बायकोचं भांडण कशावरून होऊ शकतं आणि ते कुठपर्यंत जाऊ शकतं याचं हे फारच अनोखं उदाहरण म्हणता येईल.

Wife calls police after husband refuses to wash dishes in UP | बोंबला! पतीने भांडी घासली नाही म्हणून पत्नीने बोलवले पोलीस, महिलेच्या एका प्रश्नाने पोलीस हसून हसून लोटपोट

बोंबला! पतीने भांडी घासली नाही म्हणून पत्नीने बोलवले पोलीस, महिलेच्या एका प्रश्नाने पोलीस हसून हसून लोटपोट

Husband - Wife Fight : सामान्यपणे कुठे भांडण झालं, एखादा गुन्हा घडला, चोरी झाली किंवा एखाद्या गंभीर मुद्द्यावरून वाद झाला तर पोलिसांना बोलवलं जातं. पण उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांना फोन करून बोलवण्याची एक अशी घटना समोर आली ज्याची कधी पोलिसांनी देखील कल्पना केली नसेल. नवरा - बायकोचं भांडण कशावरून होऊ शकतं आणि ते कुठपर्यंत जाऊ शकतं याचं हे फारच अनोखं उदाहरण म्हणता येईल. इथे एक महिलेला सायंकाळी स्वयंपाक घरातील सिंकमध्ये खरकटी भांडी दिसल्याने ती पतीवर भडकली. यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला. वाद इतका वाढला की, पत्नीने थेट पोलिसांना फोन करून बोलवलं.  

ही घटना उत्तर प्रदेशच्या सोनहा भागातील आहे. सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी महिला किचनमध्ये गेली. किचनमध्ये जाताच तिला सिंकमध्ये दुपारची खरकटी भांडी तशीच पडलेली दिसली. महिलेने संतापून पतीला भांडी का घासली नसल्याचा जाब विचारला. पतीने पत्नीच्या प्रश्नाकडे फारसं लक्ष दिलं नाही. यावरून दोघांचं कडाक्याचं भांडण झालं.  

पती भांडी घासेल याची महिला वाट बघत होती. तेव्हाच चिडलेल्या महिलेने ११२ वर कॉल करून पोलिसांना घरी बोलवलं. पोलिसही लगेच त्यांच्या घरी पोहोचले. गावात पोलिसांची गाडी बघून गावकऱ्यांनाही प्रश्न पडला. काहीतरी मोठं झाल्याचं सगळ्यांना वाटलं. पण जेव्हा पोलीस घरात पोहोचले तेव्हा त्यांना दिसलं की, पती-पत्नीचं भांडण सुरू आहे. जेव्हा भांडणाचं कारण पोलिसांना समजलं तेव्हा तेही हैराण झाले.   

भांडणाचं कारण विचारल्यावर महिलेने सांगितलं की, तिने पतीला अनेकदा खरकटी भांडी घासायला सांगितले. पण पतीने तिच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं. महिलेने पुढे सांगितलं की, "सायंकाळी मी जेव्हा किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी गेले तेव्हा सिंकमध्ये खरकटी भांडी पडलेली होती. याबाबत पतीला जाब विचारला तर त्याने वाद घातला. आपणच सांगा साहेब, भांडीच घासली नाही तर स्वयंपाक कसा करता येईल?". महिलेचं हे बोलणं ऐकून पोलिसांना देखील हसू फुटलं. मात्र, पोलिसांनी गंभीरतेने दोघांचंही म्हणणं ऐकून घेतलं.   

पोलिसांनी पतीची चौकशी केली तर तो गप्प बसला. पोलिसांनी दोघांनाही समजावून सांगितलं. त्यानंतर दोघे शांत झालेत. वाद मिटल्यानंतर पोलीस परत गेले. मिळालेल्या माहितीनुसार, कपलचं लग्न दोन वर्षांआधी झालं होतं. आता दोघांमधील वाद मिटला आहे.

Web Title : पति ने बर्तन नहीं धोए तो पत्नी ने पुलिस बुलाई; पुलिस हंसी से लोटपोट।

Web Summary : उत्तर प्रदेश में एक महिला ने बर्तन न धोने पर पति से झगड़ा करके पुलिस को बुलाया। पुलिस कारण जानकर हंसी नहीं रोक पाई। दो साल पहले शादी हुई थी, पुलिस ने दंपति को समझाया, विवाद सुलझा।

Web Title : Wife calls police over unwashed dishes; cops burst out laughing.

Web Summary : An Uttar Pradesh woman called police after arguing with her husband about unwashed dishes. The police, upon learning the reason for the call, could not contain their laughter. The couple, married for two years, were counseled, resolving the dispute.