पासपोर्ट फोटोमध्ये हसण्यास मनाई का असते? पाहा नेमकं काय असतं यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 12:33 IST2025-12-26T12:32:27+5:302025-12-26T12:33:36+5:30
Interesting Facts : पासपोर्ट फोटो काढताना हसण्यास मनाई का केली जाते? यामागचं कारण काय असतं? तेच आज आपण समजून घेणार आहोत.

पासपोर्ट फोटोमध्ये हसण्यास मनाई का असते? पाहा नेमकं काय असतं यामागचं कारण
Interesting Facts : आपण पासपोर्ट फोटो काढण्यासाठी स्टुडिओमध्ये अनेकदा गेले असालच. तेव्हा आपल्याला हे लक्षात असेलच की, फोटोग्राफर आपल्याला हसण्यास मनाई करतात. पण कधी आपल्याला प्रश्न पडलाय का की, पासपोर्ट फोटो काढताना हसण्यास मनाई का केली जाते? यामागचं कारण काय असतं? तेच आज आपण समजून घेणार आहोत.
मुळात पासपोर्ट फोटो काढताना हसण्यास मनाई असण्यामागे कोणती पर्सनल चॉइस नाही तर एक विज्ञान आहे. 'फॉरेन्सिक साइन्स इंटरनॅशनल' मध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, चेहऱ्यावरील हावभाव ओळख पटवण्यासाठीच्या पॅरामिटरवर प्रभाव टाकतात. रिसर्चमध्ये आढळून आलं की, हसऱ्या चेहऱ्याच्या तुलनेत न्यूट्रल आणि शांत चेहऱ्याची ओळख पटवणं अधिक सोपं आणि योग्य ठरतं. जेव्हा चेहऱ्याच्या मसल्स रिलॅक्स असतात, तेव्हा चेहऱ्याचं मोजमाप सोपं होतं.
बायोमेट्रिक नियम आणि आपला चेहरा
पासपोर्ट फोटोमध्ये स्माइल नसण्याचं कारण म्हणजे 'बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन' आहे. या सिस्टीमध्ये आपल्या चेहऱ्याचं फिक्स्ड पॉइंटचं मोजमाप घेतलं जातं. जसे की, डोळ्यांमधील अंतर, जबड्यांचा आकार, नाक आणि तोंडाची स्थिती. जेव्हा आपण स्माइल करतो, तेव्हा चेहऱ्या आकार बदलतो. म्हणजे गाल वर येतात, डोळे बारीक होतात आणि तोंड थोडं पसरतं. हसल्याने चेहऱ्या बदल झाला तर मशीन आपल्याला ओळखू शकत नाही. बायोमेट्रिक सिस्टीमला एका स्थिर चेहऱ्याची गरज असते. सॉफ्टवेअरला हावभाव नाही, नंबर दिसतात फेशिअल रिकग्निशन सॉफ्टवेअरला आपल्या आनंदाचं किंवा मैत्रीचं काही देणंघेणं नाही. हे सॉफ्टवेअर मनुष्यांचे हावभाव बघत नाही तर ते केवळ नंबर आणि पॅटर्न बघतं.
जगभरात का वापरला जातो हा नियम?
पासपोर्ट फोटो काढताना न हसण्याचा नियम केवळ एका देशात नाही तर जगभरात पाळला जातो. बॉर्डर कंट्रोल ऑफिसर आणि ऑटोमेटेड सिस्टम्स योग्यपणे काम करण्यासाठी एकसमान नियमांची गरज असते. जर हसण्याची परवानगी दिली तर प्रत्येकाची स्माइल वेगळी असेल. ज्यामुळे व्हेरिफिकेशन हळू होईल.
पासपोर्टमध्ये चुकूनही हसू नका
जर पासपोर्टसाठी अर्ज करताना फोटोत आपण हसलात तर आपला फोटो रिजेक्ट होतो. जर आपले दात दिसत असतील, डोळे बारीक झाले असतील किंवा चेहऱ्या मांसपेशीमध्ये बदल झाला असेल तर अधिकारी आपल्याकडे दुसरा फोटो मागतील. अशात आपला पासपोर्ट तयार होण्यास लेट होईल. जास्त पैसे खर्च करावे लागतील ते वेगळं. ही समस्या केवळ अर्जापुरती मर्यादित नाही तर एअरपोर्टवर लावलेले ई-गेट्सही आपली ओळख पटवण्यात फेल ठरू शकतात. याचा अर्थ आपल्याला एन्ट्री मिळणार नाही असं नाही. पण मग मॅन्युअल चेकिंग आणि प्रश्नांच्या लाइनमध्ये जास्त वेळ घालवावा लागेल.