रेल्वे ट्रॅकवर सिल्व्हर बॉक्स का लावलेले असतात? पाहा असतो यांचा उद्देश आणि कसे काम करतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:53 IST2025-12-29T12:50:01+5:302025-12-29T12:53:16+5:30
Railway Interesting Facts: हे बॉक्स कशासाठी लावलेले असतात हे आपल्याला माहीत नसेल. आपल्या मनात त्याबाबत प्रश्नही येत असतील, त्यांचंच उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

रेल्वे ट्रॅकवर सिल्व्हर बॉक्स का लावलेले असतात? पाहा असतो यांचा उद्देश आणि कसे काम करतात...
Railway Interesting Facts: भारतीय रेल्वे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी जुन्या व्यवस्थेत अनेक बदल करण्यावर भर देत आहे. ज्यात स्वच्छता, नवीन तंत्रज्ञान आणि रेल्वे ट्रॅकमध्ये बदल या गोष्टींचा समावेश आहे. आज आपण रेल्वेच्या अशाच एका तंत्रज्ञानाबाबत आपण जाणून घेणार आहोत. आपण अनेकदा रेल्वेने प्रवास करत असताना पाहिलं असेल की, रेल्वे ट्रॅकवर काही सिल्व्हर कलरचे बॉक्स लावलेले असतात. पण हे बॉक्स कशासाठी लावलेले असतात हे आपल्याला माहीत नसेल. आपल्या मनात त्याबाबत प्रश्नही येत असतील, त्यांचंच उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
रेल्वे ट्रॅकवर सिल्व्हर बॉक्स का असतात?
रेल्वे ट्रॅकवर जे सिल्व्हर बॉक्स लावलेले असतात ते अॅल्युमिनिअमचे बनवलेले असतात. त्यांना 'एक्सल काउंटर बॉक्स' असं म्हणतात. रेल्वे विभागाकडून एक्सल काउंटर बॉक्स एका खास कारणाने आणि उद्देशाने लावले जातात.
रेल्वे ट्रॅकवर लावण्यात येणारे एक्सल काउंटर बॉक्स रेल्वेच्या अशा टायरचं मोजमाप करतात, जे समोरच्या ट्रॅकवर क्रॉस होतात. या बॉक्सचं काम हे जाणून घेणं असतं की, एखादा डबा रेल्वेपासून वेगळा झाला की नाही. अशात दुर्घटनेची स्थिती बघतात सिग्नल लाल करून रेल्वे रोखली जाते. जेणेकरून आणखी मोठी दुर्घटना होऊ नये.
कसे काम करतात एक्सल काउंटर बॉक्स?
या एक्सल काउंटर बॉक्समध्ये एक खासप्रकारचं डिव्हाइस लावलेलं असतं. जे रेल्वेच्या ट्रॅकसोबत कनेक्ट असतं. हा बॉक्स रेल्वेच्या बोगीच्या टायरना जोडून ठेवतो.
जेव्हा रेल्वे यासमोरून क्रॉस होते, तेव्हा डिव्हाइसच्या मदतीने एक्सल काउंटर बॉक्समध्ये टायरची संख्या नोंदवली जाते. हे सिल्व्हर बॉक्स ट्रॅकवर दर ३ ते ५ किमी अंतरावर लावलेले असतात. रेल्वेच्या टायरची मोजणी झाली की, त्यातील डेटा पुढील बॉक्सला पाठवला जातो. जर पुढील बॉक्सने आधीच्या बॉक्सच्या तुलनेत टायरची मोजणी कमी केली तर असं मानलं जातं की, रेल्वेचा एखादा डबा वेगळा झालाय किंवा डिरेल झाला आहे. यानंतर बॉक्स लगेच सिग्नल लाल करतो, याने रेल्वे थांबते आणि दुर्घटनेची माहिती मिळते.