एखाद्याच्या मृत्यूनंतर का म्हटलं जातं RIP, अनेकांना माहीत नाही याचा खरा अर्थ; जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 14:54 IST2022-03-31T14:53:34+5:302022-03-31T14:54:54+5:30
आज आम्ही आपल्याला या शब्दाचा नेमका आणि खरा अर्थ काय हे सांगणार आहोत. एवढेच नाही, तर या शब्दाची सुरुवात केव्हा आणि कशी झाली, हेही आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

एखाद्याच्या मृत्यूनंतर का म्हटलं जातं RIP, अनेकांना माहीत नाही याचा खरा अर्थ; जाणून घ्या
एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर अनेक वेळा 'RIP' हा शब्द वापरला जातो. RIP हे शॉर्ट फॉर्म असले तरी, आता ते एखाद्या शब्दासारखे वापरले जात आहे. बर्याच जणांना या शब्दाचा नेमका अर्थ आणि फुल फॉर्म देखील माहीत नाही. मात्र, एखाद्याचे निधन झाल्यानंतर ते या शब्दाद्वारे आपले दुःख व्यक्त करतात.
जाणून घ्या RIP चा खरा अर्थ -
काही लोकांना याचा अर्थ माहीत असू शकतो. मात्र, मोठ्या प्रमाणावर लोक असेही आहेत, की ज्यांना याचा अर्थ माहीत नाही. यामुळे आज आम्ही आपल्याला या शब्दाचा नेमका आणि खरा अर्थ काय हे सांगणार आहोत. एवढेच नाही, तर या शब्दाची सुरुवात केव्हा आणि कशी झाली, हेही आम्ही आपल्याला सांगणार आहोत. आपण अनेक वेळा पाहीले असेल, की बरेच लोक RIP ला 'Rip' असे लिहून टाकतात. या 'Rip' चा अर्थ कापणे असा होता.
लॅटिन फ्रेजपासून तयार झालाय RIP -
RIP हे एक Acronym आहे. याचे फुल फॉर्म 'Rest In Peace' असे होते. या Rest In Peace ची उत्पत्ती लॅटिन फ्रेज 'Requiescat In Pace' पासून झाली आहे. Requiescat In Pace चा अर्थ 'शांतपणे झोपणे', असा होतो. मराठी मध्ये याचा संदर्भ 'आत्म्याला शांती लाभो' असा आहे. ख्रिश्चन धर्मात, असे मानले जाते, की मृत्यूनंतर 'आत्मा' शरीरापासून वेगळा होतो आणि 'जजमेंट डे' च्या दिवशी हे दोन्ही पुन्हा एकत्रित येतात.
18व्या शतकापासून झाली सुरुवात!
RIP शब्दाचा वापर 18व्या शतकापासून सुरू झाला. यापूर्वी 5व्या शतकात मृत्यूनंतर कबरींवर 'Requiescat In Pace' शब्द लिहिलेले आढळतात. ख्रिश्चन धर्मापासूनच हा शब्द वापरण्याची पद्धत सुरू झाली आणि आता हा शब्द ग्लोबल झाला आहे.