मोठे चोर किंवा दरोडेखोरही रेल्वे ट्रॅक का चोरी करू शकत नाही? कारणं अशी ज्यांचा विचारही केला नसेल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 16:41 IST2026-03-29T16:39:16+5:302026-03-29T16:41:08+5:30

Why tracks not stolen: अनेकांच्या मनात विचार येत असेल की, अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला रेल्वेचे कित्येक रूळ पडलेले असतात. मग चोर ते चोरी का करत नाहीत? जाणून घ्या याचं उत्तर....

Why railway tracks cannot be stolen India, know the reasons | मोठे चोर किंवा दरोडेखोरही रेल्वे ट्रॅक का चोरी करू शकत नाही? कारणं अशी ज्यांचा विचारही केला नसेल....

मोठे चोर किंवा दरोडेखोरही रेल्वे ट्रॅक का चोरी करू शकत नाही? कारणं अशी ज्यांचा विचारही केला नसेल....

Why tracks not stolen: रेल्वे ट्रॅकच्या पटरी चोरी करणं दिसायला सोपं काम वाटू शकतं. कारण दूरदूरपर्यंत कुणी राहत नाही, जंगलातही रेल्वे ट्रॅक असतात. शिवाय एक - दोन जरी रूळांची चोरी केली तरी चोरांना मोठी रक्कम मिळू शकते. पण मुळात रेल्वे ट्रॅक म्हणजे रूळांची चोरी करणं जवळपास अशक्य काम आहे. त्यामुळे मोठ मोठे अट्टल चोर किंवा दरोडेखोरही रूळ चोरी करण्याची रिस्क घेत नाहीत. याने त्यांची मजबूती आणि व्यावहारिक कारणं आहेत. ही कारणं काय आहेत आणि चोरांना रेल्वे रूळ चोरी करण का परवडणारं नाही हे जाणून घेऊ.

पहिलं कारण 

चोर रेल्वे रूळ चोरीच्या फंद्यात न पडण्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे रेल्वे रूळ फार वजनी असतात. एका सामान्य रूळाचा छोटासा तुकडा देखील शेकडो किलो वजनाचा असतो. इतक्या जड वस्तूला उचलणं, कापणं कुठे घेऊन जाणं जड वाहनाशिवाय आणि अनेक लोकांच्या मदतीशिवाय शक्य नाही. हे काम एकट्याने किंवा लपून करणं फारच अवघड आहे.

रूळाचं लोखंड स्पेशल

दुसरं मोठं कारण म्हणजे रूळासाठी वापरलं जाणारं मजबूत मटेरिअल. रेल्वेचे रूळ हे सामान्य लोखंडाने बनत नाहीत. त्यासाठी खासप्रकारचं स्टील वापरलं जातं. हे इतके मजबूत असतात की, त्यांना कापणं किंवा तोडणं सोपं नाही. यासाठी खास मशीन आणि उपकरणांची गरज पडते. जे सहजपणे मिळत नाहीत. तिसरी बाब म्हणजे रूळ जमिनीवर फार मजबूतीने लावले लावले जातात. रूळ कॉन्क्रीट स्लीपर, बोल्ट आणि क्लिपच्या माध्यमातून लावले जातात. या सगळ्या गोष्टी खोलण्यास खूप जास्त वेळ आणि मेहनत लागते. योग्य शस्त्रांशिवाय आणि लोकांशिवाय हे शक्य नाही.

भंगारवाले किंवा स्क्रॅप डीलर घाबरतात

रूळ चोरी न होण्याचं आणखी एक कारण म्हणजे ते विकणंही सोपं काम नाही. रेल्वे रूळांवर खास चिन्हे असतात, ज्यामुळे लगेच कळतं की, ते रेल्वेची संपत्ती आहेत. कोणतेही भंगार घेणारे किंवा स्कॅप डीलर ते खरेदी करण्यास घाबरतात, कारण पकडले गेले तर मोठी कठोर कारवाई होऊ शकते. यासाठी फार कठोर कायदेही आहेत. रेल्वे रूळांसोबत छेडछाड हा गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे अनेक वर्षांची शिक्षा होऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचं तर हे काम फार मेहनतीचं आहे आणि यात धोकाही मोठा आहे. त्यामुळे कोणतीही समजदार व्यक्ती हा धोका पत्करण्यास तयार होणार नाही.

Web Title : रेलवे ट्रैक चोरी करना क्यों है नामुमकिन: मुख्य कारण

Web Summary : रेलवे ट्रैक बेहद भारी, विशेष स्टील से बने और मजबूती से फिक्स होते हैं। चोरी के ट्रैक बेचना मुश्किल है क्योंकि उन पर विशेष निशान होते हैं और सख्त कानून हैं। जोखिम और प्रयास चोरों के लिए किसी भी संभावित लाभ से अधिक हैं।

Web Title : Why Stealing Railway Tracks is Nearly Impossible: Key Reasons

Web Summary : Railway tracks are incredibly heavy, made of special steel, and firmly fixed. Selling stolen tracks is difficult due to unique markings and strict laws. The risk and effort outweigh any potential gain for thieves.