रेल्वे स्टेशनच्या नावामागे 'जंक्शन' किंवा मग 'सेंट्रल' का लिहिलं जातं? वाचलं तर अनेकदा असेल, पण अर्थ माहीत नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:30 IST2026-01-27T16:29:42+5:302026-01-27T16:30:16+5:30

Railway Interesting Facts : तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की काही रेल्वे स्थानकांच्या नावामागे सेंट्रल, तर काहींच्या नावामागे जंक्शन किंवा टर्मिनल असं लिहिलेलं असतं? यामागे नेमकं कारण काय आहे, ते जाणून घेऊया.

Why railway station names include junction or central or terminal | रेल्वे स्टेशनच्या नावामागे 'जंक्शन' किंवा मग 'सेंट्रल' का लिहिलं जातं? वाचलं तर अनेकदा असेल, पण अर्थ माहीत नसेल

रेल्वे स्टेशनच्या नावामागे 'जंक्शन' किंवा मग 'सेंट्रल' का लिहिलं जातं? वाचलं तर अनेकदा असेल, पण अर्थ माहीत नसेल

Railway Interesting Facts : भारतात रेल्वेचा प्रवास सगळ्यात स्वस्त आणि आरामदायक मानला जातो. लाखो लोक रोज रेल्वेनं प्रवास करतात. ट्रेनच्या प्रवासात वेगवेगळे प्रदेश, तिथली संस्कृती आणि स्टेशनवर मिळणाऱ्या खास खाद्यपदार्थांचा अनुभव घेता येतो. एकंदर काय तर रेल्वेचा प्रवास हा एक वेगळा अनुभव देणारा प्रवास ठरतो. आपणही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. पण तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की काही रेल्वे स्थानकांच्या नावामागे सेंट्रल, तर काहींच्या नावामागे जंक्शन किंवा टर्मिनल असं लिहिलेलं असतं? यामागे नेमकं कारण काय आहे, ते जाणून घेऊया.

सेंट्रल आणि जंक्शन याचा अर्थ काय?

रेल्वे स्थानकाच्या नावामागे जंक्शन किंवा सेंट्रल लिहिलं जाण्यामागे ठराविक कारण असतं. हे शब्द त्या स्थानकाचं काम आणि महत्त्व दर्शवतात. जंक्शन म्हणजे असे स्थानक जिथे दोन किंवा अधिक वेगवेगळ्या रेल्वे मार्गांवरून गाड्या येतात आणि पुढे जातात. उदाहरणार्थ मथुरा जंक्शन.

तर सेंट्रल हे नाव त्या शहरातील सर्वात जुने, प्रमुख आणि अत्यंत वर्दळीचे स्थानक असल्याचं दर्शवतं. अशा स्थानकावरून शहराच्या विविध भागांमध्ये आणि वेगवेगळ्या दिशांना जाणाऱ्या गाड्या उपलब्ध असतात. उदा. – कानपूर सेंट्रल, मुंबई सेंट्रल.

टर्मिनल म्हणजे काय?

काही रेल्वे स्थानकांच्या नावामागे टर्मिनल हा शब्दही लावलेला असतो. याचा अर्थ असा की त्या स्थानकावरून ट्रेनचा प्रवास संपतो. म्हणजेच ते स्थानक त्या मार्गाचं शेवटचं ठिकाण असतं आणि ट्रेन पुढे जात नाही. म्हणजेच, सेंट्रल, जंक्शन आणि टर्मिनल हे शब्द केवळ नावापुरते नसून त्या रेल्वे स्थानकाचं महत्त्व, रचना आणि कार्य स्पष्ट करणारे असतात. पुढच्या वेळी ट्रेनने प्रवास करताना हे नक्की लक्षात ठेवा! 

रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर X का लिहितात?

railmitra.com या रेल्वेसंबंधी माहिती देणाऱ्या वेबसाइटनुसार, भारतात चालणाऱ्या काही खास रेल्वेंच्या मागेच असा साइन असतो. पॅसेंजर रेल्वेंच्या मागे पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगात X हा साइन काढलेला असतो. हा साइन सुरक्षेच्या दृष्टीने सर्वच पॅसेंजर ट्रेनच्या मागे असणं गरजेचं आहे. हा नियम भारतीय रेल्वेनेच केला आहे. यासोबतच तुम्ही हे पाहिलं असेल की, काही रेल्वे डब्यांवर एलव्ही असंही लिहिलं असतं. सोबतच रेल्वेच्या मागे लाल रंगाचा लाइटही ब्लिंक करत असतो. रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर एलव्ही लिहिण्याचा अर्थ असा की, हा डबा रेल्वेचा शेवटचा डबा आहे. हा एलव्ही नेहमी X या साइनने लिहिला जातो.

Web Title : रेलवे स्टेशनों के नाम के पीछे 'जंक्शन' या 'सेंट्रल' क्यों: अर्थ स्पष्ट किया गया।

Web Summary : रेलवे स्टेशन के नाम जैसे 'सेंट्रल' या 'जंक्शन' महत्व दर्शाते हैं। 'जंक्शन' कई मार्गों को दर्शाता है। 'सेंट्रल' शहर के मुख्य, सबसे व्यस्त स्टेशन को दर्शाता है। 'टर्मिनल' का अर्थ है कि ट्रेन की यात्रा वहां समाप्त होती है। अंतिम कोच पर 'X' निशान सुरक्षा सुनिश्चित करता है।

Web Title : Why railway stations are named 'Junction' or 'Central': Meaning explained.

Web Summary : Railway station names like 'Central' or 'Junction' indicate significance. 'Junction' denotes multiple routes. 'Central' signifies a city's main, busiest station. 'Terminal' means the train's journey ends there. The 'X' mark on the last coach ensures safety.