प्लास्टिक बॉटलच्या झाकणात रबर का लावलेलं असतं? फक्त डिझाइन नाही महत्वाचं असतं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 18:05 IST2025-07-09T18:04:47+5:302025-07-09T18:05:26+5:30
Interesting Facts : अनेकांना वाटतं की, हे रबर केवळ डिझाइनसाठी लावलं जातं. पण असं काही नाहीये. याचं कारण काय असतं तेच पाहुया.

प्लास्टिक बॉटलच्या झाकणात रबर का लावलेलं असतं? फक्त डिझाइन नाही महत्वाचं असतं कारण...
Interesting Facts : आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांचा वापर आपण रोज करतो, त्यांबाबत आपल्याला काही माहीत नसतं. आता कोल्ड ड्रिंकबाबतच घ्या. बरेच लोक रोज कोल्ड ड्रिंक पितात. आपणही रोज नाही, पण कधीना कधी कोल्ड ड्रिंक प्यायले असालच. पण आपल्याला कोल्ड ड्रिंकसंबंधी एक खास बाब माहीत नसेल. ती म्हणजे प्लास्टिकच्या बॉटलच्या झाकणाच्या आता गोल रबर डिस्क का लावली जाते. अनेकांना वाटतं की, हे रबर केवळ डिझाइनसाठी लावलं जातं. पण असं काही नाहीये. याचं कारण काय असतं तेच पाहुया.
कोरा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात काही लोकांनी विचारलं होतं की, प्लास्टिकच्या बॉटलच्या झाकणाच्या आत रबर डिस्क का लावलेली असते. अनेकांनी याची वेगवेगळी कारणं सांगितली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवरही लोकांनी फोटो पोस्ट करून विचारलं की, झाकणामध्ये रबर डिस्क का असते? सामान्यपणे सगळे हेच उत्तर देतील की, आतील कोल्ड ड्रिंक लीक होऊ नये म्हणून रबर डिस्क लावली जाते.
का दिली असते रबर डिस्क?
झाकणात रबर डिस्क केवळ इतकंच काम नसतं. फूड सेफ्टी वर्क्स वेबसाइटनुसार, सगळ्यात आधी तर रबर रिंग बॉटल चांगल्या पद्धतीनं सील करण्यास मदत करते. यानं बॉटल एअरटाइट होते. ज्यामुळे आतील ड्रिंक बाहेर येत नाही. यात केमिकल रेसिस्टेंस प्रॉपर्टीही असते. त्याशिवाय कोल्ड ड्रिंकच्या बॉटलमध्ये रबर डिस्क असण्याचं कारण अनेकदा बॉटलमधील तापमान बदलल्यानं आतील प्रेशर वाढतं. ही रिंग ते प्रेशर सहन करते.
आपल्याला माहीत नसेल पण प्लास्टिकची झाकणं polyethylene terephthalate म्हणजेच PET पासून बनवले जातात. जेव्हा ते सूर्यकिरणांच्या संपर्कात येतात, तेव्हा रिअॅक्शनमुळे त्याचे कण कोल्ड ड्रिंकमध्ये मिक्स होतात. त्यामुळे आतील पेय दूषित होऊ शकतं. रबर लावलं असल्यानं याचा धोका कमी होतो.