बऱ्याच विमानांमध्ये नसते १३ नंबरची सीट, कारण असं ज्याचा कधी विचारही केला नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 12:09 IST2026-04-02T12:08:38+5:302026-04-02T12:09:12+5:30

Airplane Interesting Facts : विमानातून आपण कधी प्रवास केला असेल तर पाहिलं असेल की, जास्तीत जास्त एअरलाईन्समध्ये १३ नंबरची कोणतीही रो नसते.

Why number 13 is skipped in airplanes, know the reason | बऱ्याच विमानांमध्ये नसते १३ नंबरची सीट, कारण असं ज्याचा कधी विचारही केला नसेल

बऱ्याच विमानांमध्ये नसते १३ नंबरची सीट, कारण असं ज्याचा कधी विचारही केला नसेल

Airplane Interesting Facts : विमानाने प्रवास हल्ली फारच सोपं झालं असलं तरी, आजही विमानात एकदा तरी बसून कधीही न विसरता येणारा प्रवास करता यावा अशी अनेकांची इच्छा असते. जमिनीवरून आकाशात उडणारं विमान आपण नेहमीच बघतो, पण आकाशातून खालचा नजारा कसा दिसतो आणि आकाश कसं असतं याचा अनुभव लोकांना घ्यायचा असतो. त्यामुळे विमानाबाबत लोकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. विमानाच्या वेगवेगळ्या रोचक गोष्टी लोक जाणून घेत असतात. आज आम्ही आपल्याला विमानाबाबत एक अशीच इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहोत.  

विमानातून आपण कधी प्रवास केला असेल तर पाहिलं असेल की, जास्तीत जास्त एअरलाईन्समध्ये १३ नंबरची कोणतीही रो नसते. म्हणजे १२ नंतर थेट १४ नंबर सुरू होतो. हा केवळ योगायोग आहे की, यामागे काही कारण आहे याचा कधी आपण विचार केला नसेल. मुळात हा काही योगायोग नाही, तर विचार करून घेण्यात आलेला निर्णय आहे. याचं कारणही अनोखं आहे. ते काय हे जाणून घेऊया. 

१३ नंबर आणि 'अशुभ' कनेक्शन

आपल्याला कदाचित माहीत नसेल, पण जगाच्या अनेक भागांमध्ये १३ या संख्येबाबत भरपूर अंधविश्वास आहेत. खासकरून पाश्चिमात्या देशांमध्ये हे अधिक बघायला मिळतात. पाश्चिमात्या संस्कृतीत १३ अंकाला अशुभ मानलं जातं. या भीतीला 'ट्रिस्कायडेकाफोबिया' म्हणतात. याची मूळं ख्रिश्चन परंपरेशी जुळलेली आहेत. द लास्ट सपर मध्ये १३वी व्यक्ती आल्यानंतर येशू ख्रिस्तांना क्रूसवर बांधण्यात आले होते. त्याशिवाय नॉर्स पौराणिक कथांमध्ये सुद्धा १३ संख्येबाबत अनेक नकारात्मक घटनांचा उल्लेख आढळतो. याची धसका प्रवासासारख्या क्षेत्रावरही बघायला मिळतो. 

विमानात का पाळला जातो हा नियम?

खरंतर विमानात प्रवास करणं बरंच तणावाचं असू शकतं. खासकरून अशा प्रवाशांसाठी ज्यांच्या मनात आधीच उड्डाणाची भीती असते. एअरलाईन्सचं मत आहे की, त्यांचे प्रवासी हे प्रवासादरम्यान शक्य असेल तेवढे रिलॅक्स रहावे. अशात जर एक सीट नंबर प्रवाशाच्या मनात कशाप्रकारची भीती निर्माण करत असेल तर कंपनीसाठी तो नंबर हटवणं समजदारीचं पाउल ठरतं. ही एक सायकॉलॉजीकल ट्रिक आहे. एअरलाईन्सकडून घेण्यात आलेला हा एक व्यावसायिक निर्णय आहे. कुणीही एअरलाईन्सची ही इच्छा नसेल की, त्यांची एखादी सीट रिकामी रहावी किंवा प्रवाशांनी ती नाकारावी. १३वी रो हटवून एअरलाईन्स त्यांचं नुकसान टाळतात. 

१७ नंबरही मानतात अशुभ

एक महत्वाची बाब म्हणजे ही प्रथा केवळ १३ नंबरपर्यंत मर्यादित नाही. इटली आणि ब्राझीलसारख्या देशांमध्ये १७ नंबरला अशुभ मानलं जातं. कारण रोमनमध्ये १७ नंबर ज्या पद्धतीने लिहिला जातो, लॅटिनमध्ये त्याचा अर्थ 'मी माझं जीवन जगून झालं', असा होतो. त्यामुळे हा नंबर अशुभ मानला जातो

Web Title : कई विमानों में क्यों नहीं होती 13 नंबर की सीट: अंधविश्वास का रहस्य

Web Summary : पश्चिमी देशों में अंधविश्वास के कारण कई एयरलाइंस विमानों में 13 नंबर की सीट नहीं रखती हैं। यात्रियों में डर से बचने के लिए यह कदम उठाया जाता है। कुछ देशों में 17 को भी अशुभ मानते हैं।

Web Title : Why Many Planes Lack a 13th Seat: Superstition Explained

Web Summary : Many airlines omit the number 13 from seat rows due to widespread superstition, particularly in Western cultures. This avoids triggering anxiety in passengers. Some countries also consider 17 unlucky.