भारतातील एक अशी नदी जी आपल्या प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने वाहते, वाचा काय असेल कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 17:23 IST2025-07-04T17:22:41+5:302025-07-04T17:23:21+5:30
Interesting Facts : क्वचितच लोकांना या नदीबाबत माहीत असेल. ही नदी कोणती आणि कुठून कुठे वाहते हे पाहुया.

भारतातील एक अशी नदी जी आपल्या प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने वाहते, वाचा काय असेल कारण
Interesting Facts : भारताला नद्यांचा देश म्हटलं जातं. कारण भारतात भरपूर नद्या आहेत. भारताच्या एकंदर विकासात नद्यांचं खूप जास्त महत्व राहिलं आहे. भारतात गंगा, यमुना, सिंधू, ब्रह्मपूत्र, कावेरी अशा पवित्र नद्या आहेत. या नद्यांनी लोकांची तहान तर भागतेच, सोबतच यांना खूप धार्मिक महत्वही आहे. देशातील जास्तीत जास्त नद्या एकाच दिशेने वाहतात. म्हणजे नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. पण तुम्हाला माहीत नसेल की, देशात एक अशीही नदी आहे जी उलट्या दिशेने वाहते. क्वचितच लोकांना या नदीबाबत माहीत असेल. ही नदी कोणती आणि कुठून कुठे वाहते हे पाहुया.
कोणती नदी उलटी वाहते?
गंगा असो वा यमुना भारतातील जास्तीत जास्त नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. पण एक नदी या नद्यांपेक्षा वेगळी ठरते. ही नदी म्हणजे नर्मदा नदी. एकीकडे भरपूर नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, तर नर्मदा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. गंगा, यमुनासारख्या जास्तीत जास्त नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जात बंगालच्या खाडीत मिळतात. तेच नर्मदा नदी उलटी वाहत जात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जात अरबी समुद्रास जाऊन मिळते.
नर्मदा नदी उलटी वाहण्याचं कारण रिफ्ट व्हॅली सांगितलं जातं. रिफ्ट व्हॅलीचा अर्थ नदीचा प्रवाह ज्या दिशेने असतो, त्याच्या उलट जमिनीचा उतार असतो. त्यामुळे नर्मदा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. ही नदी मैखल पर्वताच्या अमरकंटक शिखरातून उगम पावते. नर्मदा नदी भारतातील दोन मोठे राज्य गुजरात आणि मध्य प्रदेशची मुख्य नदी आहे.
पौराणिक कथांमध्येही प्रसिद्ध
नर्मदा नदी आपल्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहण्यामागे एक पौराणिक कथाही फेमस आहे. कथांनुसार, नर्मदा नदीचा विवाह सोनभद्रसोबत ठरलं होतं, पण नर्मदाची मैत्रीण जोहिलामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. ज्यामुळे रागावून नर्मदेने आयुष्यभर अविवाहित राहण्याचा आणि प्रवाहाच्या विरूद्ध वाहण्याचा निर्णय घेतला.