भूकंप आल्यावर मेट्रो थांबवली जाते, पण रेल्वे का नाही थांबवत? समजून घ्या कारणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:36 IST2025-07-10T13:34:35+5:302025-07-10T13:36:18+5:30
Delhi Earthquake : भूकंप आला असताना भारतात रेल्वे का थांबवल्या जात नाही? मेट्रो का थांबवली जाते? दिल्लीतील भूकंपाच्या निमित्तानं याची कारणं समजून घेऊया.

भूकंप आल्यावर मेट्रो थांबवली जाते, पण रेल्वे का नाही थांबवत? समजून घ्या कारणं
Delhi Earthquake : दिल्लीमध्ये सकाळी सकाळी भूकंपाचे काही झटके बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू हरयाणातील झज्जर होतं. यावेळी दिल्लीतीलमेट्रो थांबवण्यात आली होती. यानिमित्तानं एक प्रश्न समोर आला की, भूकंप आला असताना भारतात रेल्वे का थांबवल्या जात नाही? मेट्रो का थांबवली जाते? दिल्लीतील भूकंपाच्या निमित्तानं याची कारणं समजून घेऊया.
याबाबत एका रिपोर्टमध्ये एक्सपर्टनी सांगितलं की, भारतातील रेल्वे वजनानं खूप जड असतात आणि स्पीडही कमी असतो. जास्तीत जास्त ठिकाणी रेल्वेचे ट्रॅक जमिनीवर असतात. जे भूकंपाचे हलके झटके सहन करू शकतात. याच कारणानं हलके झटके बसत असताना रेल्वे थांबवली जात नाही.
मेट्रो का थांबवली जाते?
मेट्रो रेल्वेच्या तुलनेत हलक्या असतात आणि अनेकदा उंच खांब किंवा अंडर ग्राउंड टनलमध्ये वेगानं धावतात. मेट्रोचा स्पीड जास्त असतो. त्यामुळे भूकंपाच्या झटक्यांनी त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रभावित होऊ शकतं. या गोष्टीची काळजी घेऊन भूकंपादरम्यान मेट्रो थांबवावी लागते.
आटोमॅटिक सिक्युरिटी सिस्टीम
मेट्रोच्या सिस्टीमध्ये आधुनिक भूकंप सेन्सर लावलेले असतात, जे हलक्या झटक्यांची सूचना देतात. झटके लागताच सेन्सर मेट्रो थांबवण्याचा संकेत देतात. सामान्य रेल्वेतर अशी ऑटोमॅटित स्टिस्टीम नसते.
इन्फ्रास्ट्रक्चर सेंसिटिव
मेट्रोचं इन्फ्रास्ट्रक्चर भूकंपात अधिक संवेदनशील असतं. भूकंपाच्या झटक्यांनी हे इन्फ्रास्ट्रक्टर प्रभावित होऊ शकतं. तर सामान्य रेल्वे जमिनीवर धावत असतात.
कंट्रोल आणि मॅनेजमेंट
मेट्रोचं ऑपरेशन सेंटर कंट्रोल रूममधून होतं. इथून भूकंपाच्या स्थितीत लगेच निर्णय घेता येऊ शकतो. रेल्वेचं ऑपरेशन असं नसतं. भूकंप आला असता रेल्वे थांबवण्यासाठी स्थानिक स्तरावर निर्णय घेतला जातो. ज्यासाठी वेळही लागू शकतो.