...म्हणून ३० वर्षांपासून महिलेच्या वेशात राहते 'ही' व्यक्ती, कारण वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 12:18 PM2019-11-05T12:18:31+5:302019-11-05T12:24:53+5:30

मृत्युची भिती ही सर्वात भयानक भिती मानली जाते आणि यापासून वाचण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात.

Why this man living as a woman for 30 years in Uttar Pradesh | ...म्हणून ३० वर्षांपासून महिलेच्या वेशात राहते 'ही' व्यक्ती, कारण वाचून व्हाल अवाक्

...म्हणून ३० वर्षांपासून महिलेच्या वेशात राहते 'ही' व्यक्ती, कारण वाचून व्हाल अवाक्

Next

(Image Credit : amarujala.com)

मृत्युची भीती ही सर्वात भयानक भीती मानली जाते आणि यापासून वाचण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. याच भीतीमुळे उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या जलालपूरमधील हौज खास येथील राहणारा चिंता हरण चौहान हैराण झाला आहे.  त्याचं नाव तर चिंता हरण आहे, पण त्याला मृत्युच्या भीतीने असं काही पछाडलं आहे की, तो गेल्या ३० वर्षांपासून स्त्री बनून फिरत आहे.

amarujala.com ने दिलेल्या वृत्तानुसार, चिंता हरण ऊर्फ करियाला मृत्युची भिती असण्याचा कारण फारच विचित्र आहे. हे कारण वाचून तुम्हीही विचारात पडाल. ६६ वर्षीय चिंता हरणनुसार, प्रेत आत्मेच्या नादात त्याच्या घरातील १४ लोकांचा मृत्यू झाला होता. आता त्याला स्वत:च्या मरणाची भीती सतावत आहे. चिंता हरण जेव्हा १४ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या घरातील लोकांनी त्याचं लग्न लावून दिलं. पण लग्नाच्या काही दिवसांनंतर त्यांच्या पत्नीचं निधन झालं. यानंतर काही वर्ष तो एकटाच होता आणि २१ व्या वर्षी काम करण्यासाठी पश्चिम बंगालच्या दिनाजपूर येथे गेला.

चिंता हरणवर खाण्याच्या सामानाची जबाबदारी होती. इथे एका बंगाली व्यक्तीचं दुकान होतं. चिंता हरण याच दुकानातून नेहमी वस्तू विकत घ्यायचा. हळूहळू त्याची दुकानदारासोबत चांगली ओळख झाली. त्यानंतर दुकानदाराने चिंता हरणला त्याच्या मुलीसोबत लग्न करण्याबाबत विचारले. आणि चिंता हरणने काहीही विचार न करता दुकानदाराच्या मुलीशी लग्न केलं.

पण या लग्नाला चिंता रहणच्या घरच्या लोकांनी विरोध केला. त्यामुळे पत्नीला न सांगता चिंता हरण गावी परत आला. तिकडे बंगाली परिवाराला चिंता हरणच्या घराचा पत्ता माहीत नव्हता. त्यामुळे ही फसवणूक समजून त्याच्या पत्नीने विरहात आत्महत्या केली.

एका वर्षाने चिंता हरण कोलकाताला आला तेव्हा त्याला कळाले की, त्याच्या पत्नीने आत्महत्या केली. तो पुन्हा गावी परत गेला. इकडे घरच्या लोकांनी चिंता हरणचं तिसरं लग्न लावून दिलं. पण लग्नाच्या काही दिवसातच चिंता हरण आजारी पडला. त्यानंतर त्याच्या घरातील व्यक्तीचं निधनाचा सिलसिला सुरू झला. चिंता हरणने सांगितले की, त्याचे वडील राम जीवन, मोठा भाऊ छोटाउ, भावाची पत्नी आअणि त्याची दोन मुले, लहान भाऊ बडाऊ आणि तिसऱ्या पत्नीपासून झालेल्या तीन मुली आणि चार मुलांचं निधन झालं. 

चिंता हरणने सांगितले की, त्याची मृत बंगाली पत्नी नेहमी त्याच्या स्वप्नात येत होती आणि त्याने तिच्यासोबत जे केलं त्यासाठी खूप रडायची. आता चिंता हरण एकटाच पडला होता आणि खचला होता. त्याने एक दिवस मृत बंगाली पत्नीला परिवारातील इतर सदस्यांना काही न करण्याची विनंती केली. ती तयार झाली. पण तिने चिंता हरणला सांगितले की, मला श्रृंगार करून तुझ्यासोबत ठेव, तेव्हाच मी इतरांना काही करणार नाही.

याच भीतीमुळे गेल्या ३० वर्षांपासून चिंता हरण श्रृंगार करून एका महिलेच्या वेशात जगत आहे. त्याने सांगितले की, त्या घटनेनंतर त्याचा आजार बरा झाला आणि परिवारातील लोकांच्या मृत्युचा सिलसिलाही बंद झाला. सध्या चिंता हरणची दोन मुले जिवंत आहेत. ते त्यांच्या महिला झालेल्या वडिलांना मजुरीत मदत करतात. चिंता हरण आता एका छोट्या खोलीत राहतो, पण त्याच्या मनात भिती नेहमी असते.
 

Web Title: Why this man living as a woman for 30 years in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.