प्लास्टिकचा स्टूल तर पाहिला असेलच, यावर छोटं छिद्रही पाहिलं असेल...जाणून घ्या ते कशासाठी असतं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 13:29 IST2026-02-21T13:28:59+5:302026-02-21T13:29:55+5:30
Interesting Facts : आपल्या घरात प्लास्टिकचा स्टूल तर असेलच. यात वर एक छिद्रही असतं. ते का असतं आपल्याला माहीत नसेल. तेच जाणून घेऊ.

प्लास्टिकचा स्टूल तर पाहिला असेलच, यावर छोटं छिद्रही पाहिलं असेल...जाणून घ्या ते कशासाठी असतं
Interesting Facts : आपल्या घरांमध्ये अशा कितीतरी गोष्टी असतात ज्यांबाबत आपल्याला काहीच माहीत नसतं. खरंतर या गोष्टींबाबत आपल्या मनात अनेक प्रश्न यायला हवेत. अनेक गोष्टी तर आपण सामान्य समजून दुर्लक्ष करतो. उदाहरण द्यायचं झालं तर न्यूजपेपर आपण वाचत असालच, तर न्यूजपेपर खाली चार वेगवेगळ्या रंगांचे ठिपके असतात. ते का असतात? दुसरं उदाहरण द्यायचं तर टॉयलेटच्या फ्लशमध्ये दोन बटन असतात. दोन कशासाठी असतात? मुळात या सगळ्याच गोष्टींमागे काहीना काही उद्देश असतो. पण आज आम्ही आपल्याला आपल्या घरातील एक वेगळ्याच वस्तूची खास गोष्ट सांगणार आहोत. आपल्या घरात प्लास्टिकचा स्टूल तर असेलच. यात वर एक छिद्रही असतं. ते का असतं आपल्याला माहीत नसेल. तेच जाणून घेऊ.
भारतीय मध्यमवर्गीय लोकांच्या घरांमध्ये काही फारच कॉमन वस्तू असतात. त्यातील एक म्हणजे स्टूल. जवळपास सगळ्याच घरांमध्ये एक - दोन स्टूल तर असतातच असतात. मग आपणही कधी नोटीस केलं असेल की, या स्टूलच्या मधोमध एक छिद्र असतं. पण ते का असतं याचा विचार फारसा कुणी केला नसेल. काही लोकांना असंही वाटत असेल की, हे स्टूलवरील गोल छोटं छिद्र केवळ डिझाइनसाठी असेल किंवा मग स्टूल उचलून धरण्यासाठी असेल. पण हा समज चुकीचा आहे. कारण या छिद्राचा उद्देश खूप वेगळा आहे. तोच जाणून घेऊया.
का असतं स्टूलमध्ये छोटं छिद्र?
प्लास्टिकच्या स्टूलमध्ये छोटं छिद्र असण्याला काही खास उद्देश आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे प्रेशर आणि व्हॅक्यूम पास करणं. स्टूल घरातील जास्त जागा घेत नाहीत, ते एकावर एक ठेवता येतात. जेव्हा त्यावर बसायचं असतं तेव्हा ते वेगळे केले जातात. अशात जर त्यांमध्ये छिद्र नसेल तर स्टूल एकावर एक ठेवल्यानं प्रेशर आणि व्हॅक्यूममुळे आपसात फसतात. ज्यामुळे त्यांना वेगळं करणं अवघड होतं. अधिक जोर लावावा लागतो. पण यात छिद्र असल्याने ते सहजपणे वेगळे करता येतात. हेच या छिद्राचं मुख्य काम असतं. पण याचे इतरही काही फायदे आहेत.
स्टूलमधील छिद्राचे इतर फायदे
आपण पाहिलं असेल की, छोट्याशा प्लास्टिकच्या स्टूलवर जेव्हा एखादी वजनदार व्यक्ती बसली तरी स्टूल तुटत नाही. याचं कारण स्टूलच्या मधोमध देण्यात आलेलं छिद्र असतं. या छिद्रामुळे बॉडी वेट समान रूपानं विभागलं जातं आणि व्यक्ती व स्टूल सेफ राहतो. एकंदर काय तर स्टूलमध्ये दिलेल्या छिद्राची भूमिका खूप महत्वाची असते. जर प्लास्टिकच्या स्टूलमध्ये छिद्र नसेल तर स्टूल तुटण्याचा धोका असतो. ज्यामुळे व्यक्तीलाही इजा होऊ शकते.