सिनेमा हॉलचं एन्ट्री गेट फुल लक्झरी...पण एक्झिट गेट नेहमीच शांत आणि भकास का असतं? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 16:31 IST2026-04-01T16:30:39+5:302026-04-01T16:31:15+5:30

Cinema Hall Facts : आपल्याही लक्षात आलं असेल की, सिनेमागृहात एन्ट्री घेताना खूप झगमगाट असतो. पण जेव्हा सिनेमा बघून आपण बाहेर पडता तेव्हा जाताना एक्झिट गेट पूर्ण शांत आणि भकास असतं. पण असं का?

Why is the exit gate of a cinema hall always deserted or boring, know the reason | सिनेमा हॉलचं एन्ट्री गेट फुल लक्झरी...पण एक्झिट गेट नेहमीच शांत आणि भकास का असतं? जाणून घ्या कारण...

सिनेमा हॉलचं एन्ट्री गेट फुल लक्झरी...पण एक्झिट गेट नेहमीच शांत आणि भकास का असतं? जाणून घ्या कारण...

Cinema Hall Facts : आपण पाहिलं असेल की, आता सिनेमागृहांचं रूप फारच लक्झरी आणि हायटेक झालंय. फार पूर्वी टुरींग टॉकीज असायच्या म्हणजे तंबू टाकून पडद्यावर सिनेमा दाखवला जात होता. पडद्याच्या एका बाजूला पुरूष तर दुसऱ्या बाजूला महिला बसायच्या. टॉकीज गावात कुठेही मोकळ्या जागेवर लावल्या जात होत्या. आजही काही ग्रामीण भागात टुरींग टॉकीज असतात. पुढे सिंगल स्क्रीन सिनेमागृहे आलीत. ही बरीच आधुनिक, बसण्याची उत्तम सुविधा, चांगला साउंड, खाण्या-पिण्याची व्यवस्था, बाल्कनी, टॉयलेटची व्यवस्था असलेली होती. आता तेही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कारण त्यांची जागा आता मल्टीप्लेक्सनी घेतली आहे. मोठ्या मॉलमध्ये एकाच जागी वेगवेगळ्या स्क्रीनवर तीन ते चार सिनेमे बघायला मिळतात. बरं या सिनेमागृहांची बातच वेगळी असते. 

आताच्या मल्टीप्लेक्समध्ये लोकांच्या आकर्षणासाठी वेगवेगळ्या गोष्टी लावलेल्या असतात. सगळीकडे झगमगाट, वेगवेगळे स्टॉल, सुरक्षा, एसी अशा कितीतरी गोष्टी असतात. हे सगळं बघून लोकांना चांगलं वाटतं, आनंद मिळतो. आपणही अनेकदा सिनेमा बघायला गेले असाल. तेव्हा आपल्याही लक्षात आलं असेल की, सिनेमागृहात एन्ट्री घेताना खूप झगमगाट असतो. पण जेव्हा सिनेमा बघून आपण बाहेर पडता तेव्हा जाताना एक्झिट गेट पूर्ण शांत आणि भकास असतं. यामागचं कारण असतं? हेच आज आपण समजून घेणार आहोत.

एक्झिट गेट शांत - भकास का?

मल्टीप्लेक्समध्ये एंट्री जेवढी खास होते, एक्झिट एरिया तेवढाच भकास आणि बोर करणारा असतो. एक्झिट करतानाचा कॉरिडोर एकदम शांत असतो. पण यामागे काही कारणं असतात. एक्झिट गेट भकास असण्याचं पहिलं कारण म्हणजे सिनेमा संपल्यानंतर लोक जेवढ्या लवकर बाहेर पडतील, तेवढ्या लवकर सिनेमागृहाची स्वच्छता करता येईल आणि दुसरा शो सुरू होईल. जर एक्झिट गेटही एंट्री गेटसारखं आकर्षक असेल तर लोक तिथून लवकर बाहेर पडणार नाहीत. लोक तिथे फोटो क्लिक करत बसतील आणि दुसरा शो सुरू करण्यास उशीर होईल. यात थिएटरवाल्यांचं नुकसान होईल.

तसेच दुसरं कारण हे असतं की, लोक तिथून इमरजन्सीच्या स्थितीत लवकर आणि सुरक्षित बाहेर पडू शकतात. जर काही आकर्षित करणाऱ्या गोष्टी असतील तर कुणी ना कुणी तिथे थांबणार. याच कारणाने एक्झिट गेट साधं ठेवलं जातं. याचं आणखी एक कारण म्हणजे सिनेमा पाहिल्यानंतर लोक कशाला काही खरेदी करतील. अशात त्या ठिकाणी पैसे खर्च का करावेत. या कारणानेही एक्झिट भकास असतं. तसेच सिनेमात संपल्यावर लोकांनी लवकर बाहेर पडायचं असतं, घरी जायचं असतं. त्यामुळे ते ना कोणतं पोस्टर बघण्याच्या मनस्थितीत असता ना बोर्ड  बघण्याच्या.

Web Title : सिनेमा हॉल के एग्जिट, एंट्री की तुलना में कम आकर्षक क्यों?

Web Summary : सिनेमा हॉल सफाई और शो परिवर्तन के लिए त्वरित निकास को प्राथमिकता देते हैं। अनाकर्षक निकास देरी को हतोत्साहित करते हैं, जिससे आपातकालीन निकासी में मदद मिलती है। फिल्म के बाद खरीदारी की संभावना नहीं होती, इसलिए निकास क्षेत्र सरल और कार्यात्मक रहते हैं।

Web Title : Why Cinema Hall Exits Lack Luxury Compared to Entrances?

Web Summary : Cinema halls prioritize quick exits for cleaning and smooth show transitions. Unattractive exits discourage lingering, aiding emergency evacuations. Post-movie purchases are unlikely, so exit areas remain simple and functional.