तुम्ही सिनेमातून किंवा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना ऑपरेशन करताना हिरव्या किंवा निळ्या रंगाच्या कपड्यात बघितले असेल. पण ऑपरेशन करताना याच दोन रंगाचे कपडे डॉक्टर का वापरतात याचा तुम्ही कधी विचार केलाय का? हे कपडे लाल, पिवळ्या किंवा इतर कोणत्याही रंगाचे का नसतात?

असे म्हटले जाते की, पूर्वी डॉक्टरांपासून ते हॉस्पिटलचे सर्वच कर्मचारी पांढऱ्या रंगाचे कपडे वापरत होते. पण १९१४ मध्ये एका प्रभावशाली डॉक्टरांनी या पारंपारिक पांढऱ्या रंगाच्या ड्रेसला हिरव्या रंगात बदललं. तेव्हापासूनच हे हिरव्या कपड्यांचं चलन सुरू झालं. मात्र, काही डॉक्टर निळ्या रंगाचे कपडे वापरतात. 

जर तुम्ही कधी लक्ष दिलं असेल तर हॉस्पिटलच्या पडद्यांनाही हिरवा किंवा निळा रंग असतो. त्यासोबतच हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे कपडे आणि मास्कही हिरव्या किंवा निळ्या रंगाचे असता. पण प्रश्न हा उपस्थित होतो की, या हिरव्या आणि निळ्या रंगात असं काय खास आहे? जे इतर रंगांमध्ये नाही.  

टुडे सर्जिकल नर्सच्या १९९८ च्या अंकात प्रकाशित रिपोर्टनुसार, सर्जरीवेळी डॉक्टरांनी हिरव्या रंगाचे कपडणे वापरणे सुरू केले, कारण या रंगाने डोळ्यांना आराम मिळतो. असं अनेकदा होतं की, जेव्हा आपण एखाद्या रंगाकडे एकसारखं बघतो तेव्हा डोळ्यांना एक वेगळाच थकवा जाणवू लागतो. तसेच डोळे कोणत्याही चमकदार वस्तूला पाहून चमकतात. पण लगेच आपण जेव्हा हिरव्या रंगाकडे बघतो तेव्हा डोळ्यांना आराम मिळतो.

आता वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघायचं झाल्यास आपल्या डोळ्यांची निर्मिती अशी झाली की, ते मुख्यता लाल, हिरवा आणि निळा रंग बघण्यात सक्षम आहेत. या रंगांच्या मिश्रणाने तयार झालेले इतर कोट्यवधी रंग मनुष्यांचे डोळे ओळखू शकतात. पण या सर्वच रंगांच्या तुलनेत आपले डोळे हिरवा किंवा निळा रंगंच अधिक चांगल्याप्रकारे बघू शकतात.

आपल्या डोळ्यांना हिरवा आणि निळा रंग तेवढाच आकर्षक वाटतो, तेवढेच लाल आणि पिवळे वाटतात. हेच कारण आहे की, हिरवा आणि निळा रंग डोळ्यांसाठी चांगला मानला जातो. आणि याच कारणामुळे हॉस्पिटलमध्ये पडद्यांपासून ते कर्मचाऱ्यांच्या कपड्यांपर्यंत रंग हिरवा किंवा निळा असतो. जेणेकरून हॉस्पिटलमध्ये येणाऱ्यांना आणि तिथे राहणाऱ्या रूग्णांच्या डोळ्यांना आराम मिळावा.

डॉक्टर ऑपरेशनवेळी हिरव्या रंगाचे कपडे घालतात कारण ते सतत रक्त आणि मानवी शरीराच्या आतील अंग बघून मानसिक दबावात येऊ शकतात. अशात हिरवा रंग बघून त्यांचा तणाव दूर होतो. कधी कधी ते निळ्या रंगाच्या कपड्यांमध्येही असतात. निळा रंगही हिरव्या रंगाप्रमाणे आपल्या मेंदूवर प्रभाव टाकतो.

Web Title: Why doctors wear green clothes during operation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.