वकील काळा अन् डॉक्टर पांढरा कोट का घालतात? ९९ टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 17:16 IST2025-03-07T17:15:21+5:302025-03-07T17:16:09+5:30

Interesting Facts : मुळात या लोकांनी अशाच रंगाचे कपडे वापरणं काही केवळ फॅशन नाही. त्यामागे मोठा विचारर आणि इतिहास आहे. तोच आज जाणून घेऊ.

why doctor use white coat and lawyers use black coat | वकील काळा अन् डॉक्टर पांढरा कोट का घालतात? ९९ टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर!

वकील काळा अन् डॉक्टर पांढरा कोट का घालतात? ९९ टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर!

Interesting Facts : आपल्याच आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात. ज्या सामान्य असतात, पण त्यांच्या उत्पत्तीची किंवा त्यांची सुरूवात कशी झाली हे आपल्याला माहीत नसतं. आपण या गोष्टींकडे फारसं लक्षही देत नाही. आता हेच बघा ना डॉक्टर पांढरे कपडे घालतात आणि डॉक्टर काळा कोट घालतात हे सगळ्यांना माहीत आहे. पण ते याच रंगाचे कपडे का घालतात? असा प्रश्न आपल्याला पडत नाही. मुळात या लोकांनी अशाच रंगाचे कपडे वापरणं काही केवळ फॅशन नाही. त्यामागे मोठा विचारर आणि इतिहास आहे. तोच आज जाणून घेऊ.

वकील काळा कोट का घालतात?

तुम्ही सिनेमात किंवा प्रत्यक्षात पाहिलं असेल की, वकील पांढरी पॅंट, पांढरा शर्ट आणि वरून काळा कोट घालतात. मुळात काळ्या रंगाला गंभीरता, शक्ती आणि सन्मानाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळेच वकील काळ्या कोटचा वापर करतात. याची सुरूवात कधी आणि कशी झाली याबाबत सांगायचं तर १७ व्या शतकात ब्रिटीनचे राजा चार्ल्स द्वितीय यांच्या निधनानंतर वकिलांनी आणि न्यायाधीशांनी काळे कपडे घालणं सुरू केलं होतं. ही शोक व्यक्त करण्याची एक पद्धत होती. पुढे जाऊन तिच परंपरा बनली.

काळ्या रंगाच्या कोटची आणखी एक खासियत म्हणजे यानं व्यक्तीचं कठोर आणि शक्तिशाली व्यक्तीमत्व दिसतं. वकिलांच्या कामाची गंभीरता आणखी स्पष्टपणे दिसते. 

डॉक्टरांच्या पांढऱ्या कोटचं कारण...

तुम्ही डॉक्टरांना पांढरा कोट किंवा अॅप्रन घातलेलं पाहिलं असेल. तर पांढरा रंग हा शुद्धता, स्वच्छता, शांतता आणि विश्वासाचं प्रतीक मानला जातो.

१९व्या शतकाच्या मध्यात चिकित्सा विज्ञानात मोठा विकास झाला आणि हॉस्पिटलच्या स्वच्छतेवर जास्त लक्ष दिलं जाऊ लागलं. तेव्हापासूनच डॉक्टरांनी पांढरे कोट घालणं सुरू केलं. पांढऱ्या रंगावर डाग लगेच दिसून येतात. ज्यामुळे हा रंग डॉक्टरांना स्वच्छते प्रति जागरूक करतो.

पांढरा कोट वापरण्याचं आणखी कारण

डॉक्टरांनी पांढरा कोट वापरण्याचं दुसरं मोठं कारण विश्वास आहे. जेव्हा रूग्ण डॉक्टरांना पांढऱ्या कोटमध्ये बघतात तेव्हा त्याना विश्वास असतो की, ही व्यक्ती त्याच्यावर योग्य उपचार करू शकते. पांढऱ्या रंगाचा प्रभाव इतका खोलवर होतो की, या रंगानं रूग्णाला मानसिक शांतता आणि सुरक्षा मिळते.

पांढऱ्या रंगाची आणखी एक खासियत म्हणजे पांढऱ्या कोटमुळे डॉक्टर प्रोफेशनल आणि विश्वासू दिसतात. हा रंग रूग्णांचा विश्वास जिंकण्यात मदत करतात.
वकील काळा कोट आणि डॉक्टर पांढरा कोट केवळ फॅशन म्हणून वापरत नाही तर त्यामागे मोठा विचार असतो. उद्देश असतो. 

Web Title: why doctor use white coat and lawyers use black coat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.