मॉलमध्ये शिरताच अंगावर जोरात वारा का येतो? अनेकदा अनुभवला असेल पण माहीत नसेल कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 14:41 IST2026-03-29T14:40:59+5:302026-03-29T14:41:29+5:30
Why Strong Wind At Mall Entrance : मॉल किंवा रेस्टॉरन्टमध्ये प्रवेश केल्या केल्या थंड वारा अंगावर येतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, असं का होतं? यामागचं कारण काय आहे? तेच आज आपण पाहुयात.

मॉलमध्ये शिरताच अंगावर जोरात वारा का येतो? अनेकदा अनुभवला असेल पण माहीत नसेल कारण...
Why Strong Wind At Mall Entrance : मॉलमध्ये शॉपिंगला आणि रेस्टॉरन्टमध्ये जेवायला जाणं हल्ली फारच कॉमन झालं आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मोठाले मॉल्स असतात. इथे आपल्या गरजेच्या सगळ्याच गोष्टी मिळतात. मॉलमध्ये नुसतं फिरण्याची सुद्धा एक वेगळीच मजा आहे. आपणही अनेकदा मॉलमध्ये गेला असाल. तेव्हा आपण एका गोष्टीकडे लक्ष दिलं असेल की, मॉल किंवा रेस्टॉरन्टमध्ये प्रवेश केल्या केल्या वाऱ्याची एक थंड झुळूक अंगावर येते. ही हवा इतकी जोरात येते की, केसही विस्कटतात आणि कपडेही उडतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, असं का होतं? यामागचं कारण काय आहे? तेच आज आपण पाहुयात.
व्हेंटिलेशन सिस्टीम आणि एअर कर्टन
एखाद्या मोठ्या मॉल्स किंवा इमारतीमध्ये व्हेंटिलेशन सिस्टीम अशाप्रकारे बनवली जाते की, आतील हवा शुद्ध आणि थंडी रहावी. यासाठी एअर कंडीशनिंग सिस्टीमचा वापर केला जातो. जो आतील गरम गवा बाहेर काढतो आणि थंडी हवा आत घेतो. जेव्हा मॉलचे ऑटोमॅटिक दरवाजे उघडले जातात तेव्हा बाहेरची गरम हवा आत येण्याचा प्रयत्न करते. यामुळे एअर कडींशनिंग सिस्टीमवर दबाव पडतो आणि आतील तापमान वाढतं. ही समस्या रोखण्यासाठी इमारतींमध्ये एका खास टेक्नीकचा वापर केला जातो. ज्याला एअर कर्टन म्हणजे हवेचा पडदा म्हटलं जातं.
एअर कर्टन एका अदृश्य पडद्यासारखं काम करते. दरवाजाच्या वरच्या बाजूला लावलेल्या या सिस्टीममधून जोरात खाली हवा सोडली जाते. ही हवा आतल्या आणि बाहेरच्या हवेच्या मधे एक भींत बनते. ज्यामुळे बाहेरची गरम हवा आत येत नाही आणि आतील थंड हवा बाहेर जात नाही.
कशी काम करते एअर कर्टन सिस्टीम?
एअर कर्टन हे एक इलेक्ट्रिक डिवाइस आहे. जे दरवाजाच्या वरच्या बाजूला लावलं असतं. जेव्हा हे सुरू होतं तेव्हा त्यातून वेगानं हवा सोडली जाते. ही हवा खालच्या बाजूनं वाहते. या हवेचा एक अदृश्य पडदा तयार होतो. जेणेकरून आतील हवा बाहेर जाऊ नये आणि बाहेरची गरम हवा आत येऊ नये. अशाप्रकारे इमारतीच्या आतील तापमान स्थिर राहतं आणि एअर कंडीशनिंग सिस्टीमला जास्त मेहनत करावी लागत नाही.